Home /News /entertainment /

Jr NTR सोबत सिनेमात दिसणार Janhvi Kapoor? यावर बोनी कपूर यांनी दिलं असं उत्तर

Jr NTR सोबत सिनेमात दिसणार Janhvi Kapoor? यावर बोनी कपूर यांनी दिलं असं उत्तर

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) साऊथ इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. यावर बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 24 फेब्रुवारी- श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) साऊथ इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. पहिल्यांदा अशी चर्चा होती की, ती तेलुगू सुपरस्टार विजय देवरकोंडा सोबत दिसणार आहे. मात्र तिच्या जागी ‘लाइगर’ सिनेमात अनन्या पांडेला घेण्यात आलं. आता पण तिच्या टॉलिवूड डेब्यूची चर्चा रंगलेली आहे. अशी चर्चा आहे की, जान्हवी कपूर Jr NTR सोबत एका स्पोर्ट्स ड्रामा सिनेमातून टॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तिच्याशी Mythri Movie निर्मात्यांनी संपर्क केला आहे. जे Jr NTR च्या बुची बाबू प्रोजेक्टचा निर्मिती करणार आहे. याविषयी अधिकृत अशी कोणतीच माहिती समोर आलेली नाही. Jr NTR सोबत काम करण्याच्या प्रश्नवर जान्हवीचे वडील बोनी कपूर यांची अशी होती रिअॅक्शन बोनी कपूर यांना हैदराबादमध्ये वलीमाई प्री-रिलीज इव्हेंटमध्ये जेव्हा एका पत्रकाराने विचारले की, तुमची मुलगी खरोखरच ज्युनियर एनटीआरसोबत सिनेमात दिसणार आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले की, ही एक सोशल मीडिया अफवा आहे..यात काहीच सत्य नाही. सोशल मीडियावर अशा अफवा पसतर असतात. जान्हबद्दल पसरलेली अफवा देखील त्याचाच एक भाग आहे. वाचा-'कुणी नसलं तरी चालेल ..', अरुंधती साकारणाऱ्या अभिनेत्रीचा Video Viral देवरकोंडाच्या आधी रामचरणसोबत डेब्यूची रंगली होती चर्चा टॉलिवूडमधील काही युवा स्टार्संनी देखील जान्हवीचं नाव अप्रोच केलं होतं. त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले कारण जान्हवी सध्या बॉलिवूड सिनेमांवर लक्ष देत आहे. यापूर्वी अशी चर्चा होती की, जान्हवी रामचरणसोबत तेलुगू सिनेमा इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार होती. मात्र काही काळानंतर तिनं हे खोटं असल्याचे सांगितलं. वाचा-माझ्याशी लग्न करणार का?', अभिनेत्रीनं पोस्ट व्हायरल होताच केली Delete दिग्दर्शक एसएस राजामौली हे राघवेंद्र राव यांच्या शोमध्ये म्हणाले होते की, मानधनामुळे त्यांना 'बाहुबली'मध्ये श्रीदेवी यांना घेता आले नसल्याचे त्यांनी बोलून दाखवलं होतं. मानधनाच्या(remuneration issues) मुद्दयावरून श्रीदेवी यांना बाहुबलीमध्ये घेता आले नाही. श्रीदेवी यांच्याप्रमाणेच जान्हवी कपूर देखील आता काही कारणावरून टॉलिवूड सिनेमांचा भाग होत नसल्याची दिसते.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Janhavi kapoor, Marathi entertainment, Tollywood

    पुढील बातम्या