Home /News /entertainment /

VIDEO: विद्या बालनचं 'मैं शेरनी' गाणं रिलीज; स्त्री शक्तीला केलं अभिवादन

VIDEO: विद्या बालनचं 'मैं शेरनी' गाणं रिलीज; स्त्री शक्तीला केलं अभिवादन

विद्या बालन पुन्हा एकदा ‘शेरनी’ (Sherani) या चित्रपटातून आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं ‘मैं शेरनी’ गाणं नुकताच रिलीज झालं आहे.

    मुंबई, 16 जून-  बॉलिवूड अभिनेत्री(Bollywood Actress)  विद्या बालन (Vidya Balan)  एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विद्याने आजपर्यंत अनेक विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. तिला आपला चित्रपट चालवण्यासाठी कोणत्याही प्रसिद्ध अभिनेत्याची गरज नसते. विद्या बालन पुन्हा एकदा ‘शेरनी’ (Sherani) या चित्रपटातून आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं ‘मैं शेरनी’ गाणं नुकताच रिलीज झालं आहे. अभिनेत्री विद्या बालन नेहमीचं अभिनेत्री केंद्रित भूमिका साकारते. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला एक खास चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिने नेहमीचं वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. विद्या बॉलिवूडमध्ये आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. स्त्री केंद्रित असलेला विद्याचा ‘शेरनी’ हा चित्रपट 18 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र तत्पूर्वी यातील ‘मैं शेरनी’ हे गाणं रिलीज झालं आहे. आणि रिलीज होताच चर्चेचा विषय बनला आहे. (हे वाचा: HBD: श्रीदेवीच्या प्रेमात होते मिथुन; पत्नीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न? ) ‘मैं शेरनी’ या गाण्यामध्ये आपल्या बळावर आपलं कर्तुत्व सिद्ध करणाऱ्या महिलांना दाखवण्यात आलं आहे. समाजामध्ये विविध क्षेत्रात पुढाकार घेऊन उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्वचं महिलांना याद्वारे अभिवादन करण्यात येत आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील रणरागिणी दाखवण्यात आल्या आहेत. विद्याने या गाण्याबाबत म्हटलं आहे, जगातील असं कोणतही क्षेत्र नाही जिथं महिला चमकू शकत नाहीत. असं कोणतही काम नाही जे महिलांना अशक्य आहे. महिला खुपचं कणखर आहेत. वेळ पडल्यास त्या कोणत्याही अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकतात. आणि या सर्व महिलांना या गाण्याद्वारे अभिवादन करण्यात येत आहे. (हे वाचा:HBD: 'त्या' गाण्यासाठी चक्क गर्लफ्रेंडशी केलं ब्रेकअप; अमाल मलिकचा अतरंगी किस्सा  ) हे गाणं गायिका अक्साने म्हटलं आहे. तर यामध्ये रफ्तारचा रॅपसुद्धा आहे. याला उत्कर्ष धोतेकर यांनी संगीत दिलं आहे. या गाण्याला मोठ्या प्रमाणात पसंत केलं जातं आहे. आणि विद्याचं कौतुकदेखील होतं आहे. शेरनी हा चित्रपट 18 जूनला अमेझॉन प्राईमवर आपल्या भेटीला येणार आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    पुढील बातम्या