Home /News /entertainment /

बापरे! उर्वशी रौतेलानं परिधान केलेला 15 कोटींचा ड्रेस पाहिलात का? वाचा काय आहे खासियत

बापरे! उर्वशी रौतेलानं परिधान केलेला 15 कोटींचा ड्रेस पाहिलात का? वाचा काय आहे खासियत

नुकताच बॉलिवूड (Bollywood Actress) अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela) आंतराष्ट्रीय अल्बम (International Album) रिलीज झाला आहे.

  मुंबई, 18 मे-  नुकताच बॉलिवूड (Bollywood Actress) अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela) आंतराष्ट्रीय अल्बम (International Album) रिलीज झाला आहे. या अल्बमला तुफान लोकप्रियता मिळत आहे. रिलीज झाल्यापासून तिचा अल्बम ‘वर्साचे बेबी’(Versace Baby)  ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे उर्वशी सध्या चर्चेत आहे. उर्वशी यामध्ये इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमदानसोबत (Mohmmad Ramdan) झळकली आहे. गाण्यामधील उर्वशीचा अंदाज चाहत्यांना चांगलाच पसंत पडत आहे. मात्र तिच्या या लुक संबंधी अशी एक गोष्ट समोर आली आहे. जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
  या गाण्यामध्ये उर्वशी एका सुंदर अशा ‘बॉडीकॉन’ ड्रेसमध्ये दिसून आलीय. या ड्रेसची किम्मत चक्क 15 करोड रुपये इतकी आहे. सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार उर्वशी ड्रेस 15 करोड रुपयांचीच आहे. ‘वर्साचे बेबी’ हे गाणं चांगलंचं लोकप्रिय ठरत आहे. या गाण्यामध्ये उर्वशीच्या लुकची सुद्धा जोरदार चर्चा होतं आहे. यामध्ये उर्वशीने नेव्ही ब्ल्यू रंगाचा बॉडीकॉन ड्रेस आणि रेड कलरचा बॉडीकॉन ड्रेस असे दोन ड्रेस परिधान केले आहेत. तिचे हे ड्रेस स्वतः डिझायनर दोनतिला वर्साचेने डिझाईन केले आहेत आणि त्याची किंमत 15 करोड सांगितली जात आहे. (हे वाचा: VIDEO: 'बिग बॉस 14'ची विजेती रुबिना दिलैकने सांगितला Covid रिकव्हरीचा प्रवास ) त्याचबरोबर असादेखील दावा करण्यात येत आहे, की उर्वशीच्या या 6 मिनिटांच्या व्हिडिओसाठीचं तिचं आउटफिट डिझाईन करण्यासाठी तब्बल 1 वर्षाचा कालावधी लागला आहे. (हे वाचा:'Covid वर कशी मात केली हे सांगणार नाही', कोरोनामुक्त होताच कंगनाची अजब पोस्ट  ) उर्वशीच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती आपल्या येणाऱ्या ’इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसिरीजमध्ये बिझी आहे. यामध्ये ती अभिनेता रणदीप हुड्डा सोबत दिसणार आहे. त्याचबरोबर उर्वशी लवकरच तमिळमध्ये आपला डेब्यू करणार आहे. हा एक बिग बजेट चित्रपट आहे. तसेच हा चित्रपट सायन्स फिक्शनवर आधारित आहे. यामध्ये उर्वशी आयआयटीएन आणि एका मायक्रो बायोलोजीस्टच्या भूमिकेत दिसणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment, Urvashi rautela

  पुढील बातम्या