Home /News /entertainment /

ऋषभ पंतवरून Urvashi Rautela ट्रोल ; अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर की, ट्रोलरच झाला Troll

ऋषभ पंतवरून Urvashi Rautela ट्रोल ; अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर की, ट्रोलरच झाला Troll

अभिनेत्री उर्वशी रौतेलाचं (Urvashi Rautela troll ) नाव बऱ्याचदा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (rishabh pant) सोबत जोडलं गेलं आहे. यावरून नुकताच एक मजेशीर किस्सा घडला आहे.

    मुंबई, 15 जानेवारी - क्रिकेटपटू आणि बॉलिवूड तारका यांच्यातील नात्याची नेहमीच चर्चा होत असते. काही अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंशी संसारही थाटला आहे. आता नेटिझन्सनी या पंक्तीत आणखी एका स्टार कपलची भर घातलीय. अभिनेत्री उर्वशी रौतेलाचं (Urvashi Rautela troll ) नाव बऱ्याचदा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत  (rishabh pant) सोबत जोडलं गेलं आहे. यावरून नुकताच एक मजेशीर किस्सा घडला आहे. उर्वशी रौतेला (URVASHI RAUTELA )बॉलिवूडमधील एक आघाडीची नायिका असून अल्पावधीतच तिने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. तिने आपल्या कर्तृत्वाने आपले आणि देशाचे नावही जागतिक पटलावर रोशन केले आहे. एवढंच नाही तर तिच्या लूकचेही असंख्य चाहते आहेत. नुकतेच उर्वशीने इन्स्टाग्रामवर ४५ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. तिने एक खतरनाक स्टंट करत ही कामगिरी सेलिब्रेट केली आहे. परंतु, यावरून तिला ट्रोललाही सामोरं जावं लागलं आहे. उर्वशीच्या रिअॅक्शनने ट्रोलरच झाला ट्रोल उर्वशीने आपल्या इन्स्टावरून स्टंटचा व्हिडिओ शेअर केला. यावर एका सोशल मीडिया युजरने उर्वशीला ऋषभ पंतच्या नावानं ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावरील उर्वशीच्या प्रतिक्रियेनं ट्रोलरच ट्रोल झाला. युजरने उर्वशीच्या पोस्टवर कमेंट करताना लिहलं की, “पंतचं100 पाहिलं का काल”. यावर उर्वशीनं लिहलं की, “ओह, तुमचं मत आहे पँट (पँटची इमोजी वापरून). हो मी पाहिली कारण ती सर्वजण परिधान करतात. आणि हो मला यात 100 रुपयेही मिळाले.
    ऋषभ आणि उर्वशी यांच्यातील नात्याची अफवा उर्वशी आणि ऋषभ यांचं नाव एकमेकांसोबत नेहमीच जोडलं जात आहे. दोघांमध्ये काही काळ चांगली मैत्रीही होती. दोघांमध्ये खास नातं असल्याचीही अफवा होती. परंतु, अचानक दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना ब्लॉक केलं. यामागचं कारण कुणालाच माहीत नाही. पण तेव्हापासूनच दोघांना एकमेकांच्या नावानं छेडण्यास सुरुवात झाली आहे. वाचा-अभिनेत्री समंथाचे हार्ड वर्कआऊट ट्रेनिंग पाहिले का? तुम्हालाही फुटेल घाम दरम्यान, उर्वशी काही काळापूर्वीच Miss Universe Pageant 2021 ची जज म्हणून दिसली होती. विशेष म्हणजे ती Miss Universe ला जज करणारी सर्वात कमी वयाची सेलिब्रेटी ठरली होती. याशिवाय उर्वशी अरबचा सुपरस्टार Mohamed Ramadan सोबत इंटरनेशनल सॉन्ग Versace Baby मध्येही दिसली होती.
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood News, Cricket news, Entertainment, Rishabh pant, Urvashi rautela

    पुढील बातम्या