उर्वशी रौतेलाची चोरी पुन्हा पकडली गेली, 'या' अभिनेत्याचा मेसेज केला कॉपी पेस्ट

काही दिवसांपूर्वी तिनं प्रसिद्ध मॉडेल गिगी हदीद (Gigi Hadid)पोस्ट कॉपी करून इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.

News18 Lokmat | Updated On: Jun 8, 2019 04:55 PM IST

उर्वशी रौतेलाची चोरी पुन्हा पकडली गेली, 'या' अभिनेत्याचा मेसेज केला कॉपी पेस्ट

मुंबई, 08 जून :नुकत्याच अलीगढमध्ये एका लहान मुलीची निर्घृण हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेनंतर संपूर्ण बॉलिवूडनंही यावर टीका केली. जुनी उधारी चुकवली नाही म्हणून एका व्यक्तीने मुलीची हत्या केल्याचं स्पष्ट झालं. तिचा मृतदेह गावाबाहेरील कचरापेटीत सापडला. पण तिच्यावर कोणत्याही प्रकारचे अत्याचार न झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. यानंतर सोशल मीडियावरून सर्वांनीच आपला संताप व्यक्त केला. या प्रकरणात अटक झालेल्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वांनी केली आहे.

बॉलिवूडच्या प्रत्येक कलाकारानं या घटनेवरील आपला राग आपल्या ट्वीटमधून व्यक्त केला. पण अभिनेत्री उर्वशी रौतेलानं मात्र बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा मेसेज जसाच्या तसा कॉपी करून ट्वीट केलं आहे. सिद्धार्थनं लिहिलं, 'हे वृत्त ऐकल्यावर मी खूप अस्वस्थ झालो आहे. हे खरंच खूप भीतीदायक आहे की, आपल्याकडे एक निरागस मुलगीसुद्धा सुरक्षितपणे जगू शकत नाही. मी पोलिसांना विनंती करतो की, या घटनेवर योग्य ती चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई केली जावी. ज्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत.'

पत्नी अवंतिकाशी घटस्फोटाबद्दल इम्रानला विचारला प्रश्न, ही दिली पहिली प्रतिक्रिया


सिद्धार्थचा हा मेसेज अभिनेत्री उर्वशी रौतेलानं कॉपी करत आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला.

Loading...

करण ओबेरॉय रेप केसमध्ये आता आली काळी जादू, प्रकरणाला नवं वळण


एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची पोस्ट कॉपी करण्याची उर्वशीची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी तिनं तिच्या इन्स्टाग्राम एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट तिनं प्रसिद्ध मॉडेल गिगी हदीद (Gigi Hadid)हिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. तसेच त्या आर्टिकलच्या स्क्रिनशॉटसोबत उर्वशीनं लिहिलेला मेसेजही तिचा स्वतःचा नव्हता. हा मेसेजसुद्धा तिनं गिगी हदीदचाच कॉपी केला होता.पण नंतर तिनं ही पोस्ट डिलीट केली.

‘या’ हॉलिवूड स्टार कपलला घर विकणे आहे, किंमत ऐकून तुम्ही व्हाल हैराण

दरम्यान बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार, अर्जुन कपूर, ट्विंकल खन्ना, अनुपम खेर, अभिषेक बच्चन, रवीना टंडन, राजकुमार राव, आयुष्यमान खुराना इत्यादी बॉलिवूड कलाकारांनीसोशल मीडियाद्वारे या घटनेचा निषेध व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2019 04:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...