सगळ्यांना माझ्या आणि सलमानच्या लग्नाची चिंता-तब्बू

सगळ्यांना माझ्या आणि सलमानच्या लग्नाची चिंता-तब्बू

मीडियाच्या प्रतिनिधींनी लग्नाचा प्रश्न विचारण्याच्या तयारीत असतानाच तब्बूने लगेच उत्तर दिलं.

  • Share this:

14 आॅक्टोबर : सध्या "गोलमाल अगेन" ची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान मीडिया प्रतिनिधींच्या उत्तरांना सामोरं जाताना तब्बूने आपल्या लग्नाबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा चांगलाच समाचार घेतला.

मीडियाशी संवाद साधताना तब्बू म्हणाली की, "सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत एकाच प्रकारची उत्तरं देते असते.लोकांच्या प्रश्नांशी एवढी परिचित झाली आहे की मला प्रश्न विचारायच्या आधीच लोकांचे भाव समजून येतात."

मीडियाच्या प्रतिनिधींनी लग्नाचा प्रश्न विचारण्याच्या तयारीत असतानाच तब्बूने लगेच उत्तर दिलं. "आता तुम्ही मला लग्नाबद्दल विचारणार ना? मला वाटतं की, सगळ्यांना माझ्या आणि सलमानच्या लग्नाची चिंता आहे असं म्हणत तिने टीकाकारांना प्रतिउत्तर दिलं. पुढे तिने कॉमेडी करणं हे खूप कठीण असतं अशी कबुलीही दिली.

या चित्रपटामध्ये तब्बू एका तांत्रिकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसंच या चौथ्या सिक्वलमध्ये अजय देवगण, अरशद वारसीसह परिणीती चोप्रा दिसणार आहे.

First published: October 14, 2017, 8:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading