Birthday Special: हिप्पीपासून वेश्येपर्यंत या चित्रपटात तब्बूने साकारल्या आऊट ऑफ बॉक्स भूमिका

Birthday Special: हिप्पीपासून वेश्येपर्यंत या चित्रपटात तब्बूने साकारल्या आऊट ऑफ बॉक्स भूमिका

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabbu)ने आज वयाची पन्नाशी पूर्ण केली आहे. वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याकडे तब्बूचा नेहमीच कल असतो. जाणून घेऊया तिने साकारलेल्या या विशेष भूमिकांबद्दल

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर: हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक असलेल्या अभिनेत्री तब्बूचा आज वाढदिवस आहे. तिच्या 40 वर्षांच्या कारकीर्दीत विविध भूमिका केल्या आहेत. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल तिला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.  तसंच तिला दोनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही देऊन गौरवण्यात आलं आहे. तब्बू आता रुपेरी पडद्यावर वारंवार दिसत नाही. पण जेव्हा जेव्हा ती एखादी भूमिका साकारते तेव्हा तब्बू तिच्या पात्रमध्ये जीव ओतते त्यामुळे तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आकर्षित करते. चला तर मग  तब्बूच्या संस्मरणीय असलेल्या काही भूमिकांवर नजर टाकूया

सईदाबाई

'अ सूटबेल बॉय'या बीबीसी वनच्या टीव्ही मालिकेत तब्बूनी सईदाबाई या वेश्येची भूमिका केली होती समीक्षकांकडून त्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं होतं. तिच्या पहिला सीनमध्ये जिथे सईदा उच्चभ्रू भारतीयांच्या समारंभात शिरते आणि तब्बू ज्या प्रकारे तिच्या बॉडी लँग्वेजमुळे आपलं पात्र साकारते हे पाहून तब्बू प्रत्येक रोल उत्तमरित्या कसा निभावते हे दिसलं होतं. भूमिकेच्या मागणीनुसार ती आपल्या कलेच्या नवनव्या छटा दाखवते. ही मालिका मीरा नायर यांनी दिग्दर्शित केली होती. तब्बूने केलेली पहिली आणि एकमेव टीव्ही मालिका आहे.

अनाया

तब्बूने जवानी जाननेममध्ये एका 21 वर्षीय मुलीच्या आईची भूमिका साकारली होती. तब्बूची ही भूमिका थोड्या वेगळ्या धाटणीची होती. या सिनेमात तिने हिप्पीची भूमिका साकारल्यामुळे समीक्षकांना भूमिका वेगळी वाटली. या चित्रपटाद्वारे तब्बूने तिच्या नेहमीच्या पारंपरिक आवताराला फाटा देत आव्हानात्मक भूमिका साकारली. जानेवारी 2020 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात तब्बू आणि सैफ अली खान बर्‍याच दिवसानंतर पडद्यावर  एकत्र दिसले होते.

सिमी

2018 साली श्रीराम राघवन दिग्दर्शित अंधाधून चित्रपटात ती एका नेगेटिव्ह भूमिकेत दिसली होती. तब्बूने व्यभिचार करणार्‍या पत्नीची भूमिका निभावली. ज्यामध्ये तिने स्वार्थासाठी खून करण्यास आणि फसवणूक करण्यास तयार असलेल्या सिमीची भूमिका वठवली होती.

मंजू

2019 मध्ये 'दे दे प्यार दे' या चित्रपटात तिने अजय देवगणच्या घटस्फोटित पत्नीची भूमिका साकारली होती. समीक्षकांनी अजय देवगणसोबत तिच्या केमिस्ट्रीचेही कौतुक केलं होते.

बेगम हजरत जान महल

तब्बूने 2016 साली चार्ल्स डिकेन यांच्या ‘ग्रेट एक्स्पेक्टेशन्स’ या कादंबरीवर आधारित ‘फितूर’ या चित्रपटात एक पात्र साकारले होते. जरी बॉक्स ऑफिसवर चित्रपट चांगला कामगिरी करू शकला नाही, तरी तब्बूच्या अभिनयाचे चित्रपटाच्या समीक्षकांनी कौतुक केले. डिकन्स यांच्या कादंबरीतील मिस हविशम या पात्रातून प्रेरणा घेऊन बेगम हजरत जान महलचं पात्र घेतलं होतं. तिने 'फिरदौस' (कॅटरिना कैफने साकारलेल्या) व्यक्तिरेखेच्या आईची भूमिका केली होती.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 4, 2020, 2:23 PM IST

ताज्या बातम्या