दुखापतीचे व्रण, पायात प्लॅस्टर, तापसीचे फोटो पाहून चाहते झाले हैराण

दुखापतीचे व्रण, पायात प्लॅस्टर, तापसीचे फोटो पाहून चाहते झाले हैराण

अभिनेत्री एवलिन शर्माशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही तापसीच्या तब्येतीची चौकशी केली.

  • Share this:

मुंबई, 09 जून- बॉलिवूडमध्ये सध्या नव्या पिढीची वेळ चालत आहे. विकी कौशल, राजकुमार राव, आयुष्यमान खुराना यांसारखे कलाकार आपलं नाणं खणखणीत वाजवत आहेत तर दुसरीकडे भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नूही या शर्यतीत मागे नाहीत. बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेत्रींमध्ये तापसीचं नाव घेतलं जातं. आपल्या नवनवीन प्रोजेक्टमधून तिने आपलं स्थान पक्क केलं आहे.

यावर्षी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती बदला सिनेमांत दिसली होती. या सिनेमानंतर ती आता अजून एका सिनेमात दिसणार आहे. तापसीने गेम ओवर या तमिळ- तेलगू सिनेमात काम केलं. यात तिने एका व्हिडिओ गेम प्रोग्रामरची व्यक्तिरेखा साकारली आहे. स्वप्ना असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तिच्या घरात काही लोक शिरतात आणि त्यांच्यामुळे तिला दुखापत होते आणि ती व्हीलचेअरवर बसते.

सेक्रेटरीच्या पार्थिवाला अमिताभ- अभिषेकने दिला खांदा, ऐश्वर्याही झाली भावुक

या अभिनेत्रीला आईने मारून काढलं होतं घराबाहेर, तिने वडिलांवर लावला १२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

तापसीने गेम ओव्हर सिनेमाच्या सेटवरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. सिनेमाचं चित्रीकरण कुठपर्यंत झालं याचा अंदाजही तिच्या या पोस्टमधून चाहत्यांना येतो. नुकताच तापसीने सेटवरचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिचा एक हात भाजलेला दिसत आहे तर दोन्ही पायांना प्लॅस्टर लागलं आहे. या फोटोला कॅप्शन देताना तापसीने लिहिले की, ‘बर्फाळ पर्वतरांगांवर शिफॉनची साडी नेसून २५ दिवस शूट करणं खूप कठीण असतं. म्हणूनच मी हे निवडलं.’

सुश्मिता सेनच्या भावाने कोर्टात जाऊन केलं लग्न, इथे पाहा PHOTO

तापसीचा हा फोटो पाहून अभिनेत्री एवलिन शर्माने कमेंट करत तिला नक्की काय झालं असा प्रश्न विचारला. तसेच तिला लवकर बरं होण्यासाठीच्या शुभेच्छाही दिल्या. एवलिनशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही तापसीच्या तब्येतीची चौकशी केली. तापसीच्या या फोटोमध्ये तिला खरंच दुखापत झाली की हा फक्त मेकअप आहे याचा खुलासा तिने केलेला नाही.

पॉकेटमनीसाठी सोनम कपूर करायची वेटरची कामं

तापसीने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं की गेम ओवर या सिनेमासाठी तिने २५ दिवस व्हीलचेअरवर घालवले आहेत. अश्विन सरवनन यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेला हा सिनेमा १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

VIDEO : अंडी आणि टोमॅटोचा झाला बर्फ, फोडण्यासाठी जवानांना वापरावा लागतोय हातोडा

First published: June 9, 2019, 3:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading