'रश्मी रॉकेट' सिनेमाचा फर्स्ट लूक व्हायरल; आणखी एका आव्हानात्मक भूमिकेसाठी तापसी सज्ज
'रश्मी रॉकेट' सिनेमाचा फर्स्ट लूक व्हायरल; आणखी एका आव्हानात्मक भूमिकेसाठी तापसी सज्ज
अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) रश्मी रॉकेट(Rashmi Rocket) या नव्या फिल्मचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यासोबतच ती मिताली राजच्या बायोपिकमध्येही झळकणार आहे.
मुंबई, 09 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) तिच्या नव्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमाचं नाव ‘रश्मी रॉकेट’ (Rashmi Rocket) असं आहे. तापसीने पहिल्यांदाच या फिल्मचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या सिनेमामध्ये तापसी अॅथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘कारवा’ सिनेमाचा दिग्दर्शक आकर्ष खुराना(Akarsha Khurana) या फिल्मचं दिग्दर्शन करणार आहे.
तापसी आपल्या सिनेमांसाठी नेहमीच वेगवेगळी आव्हानं स्वीकारते. या फिल्ममध्ये एका अॅथलिटची भूमिका साकारण्यासाठीही तापसीने खूप कष्ट घेतले आहेत. तापसीने रश्मी रॉकेट या सिनेमाचा फस्ट लूक स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या सिनेमाची निर्मिती रोनी स्क्रूवालाने केली आहे. मागच्या आठवड्यापासूनच फिल्मच्या शूटिंगला सुरुवात झाली.
रश्मी रॉकेटचा फर्स्ट लूक
सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये तापसी रनिंग ट्रॅकवर पाठमोरी उभी आहे, असं दाखवण्यात आलं आहे. या सिनेमामध्ये ती एका गुजराती मुलीची भूमिका साकारत आहे. जिने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर इंटरनॅशनल लेव्हलवर स्वत:चं नाव नेऊन ठेवलं.
मिर्झापूर 2मधील प्रियांशू तापसीसोबत झळकणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी रीलिज होईल अशी शक्यता आहे. रश्मी रॉकेटचं बरचसं शूटिंग भुजमध्येच होणार आहे. या सिनेमासोबतच तापसीच्या हातात ‘हसीन दिलरुबा’ 'लूप लपेटा' असे चित्रपटही आहेत. भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या बायोपिकमध्येही तापसी दिसून येणार आहे. या सिनेमाचं नाव ‘शाबाश मितू’ असं असणार आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.