Home /News /entertainment /

'सावरकरांचा अपमान सहन करणार नाही', स्वरा भास्करला जीवे मारण्याची धमकी

'सावरकरांचा अपमान सहन करणार नाही', स्वरा भास्करला जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खाननंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करला ( Swara Bhaskar) धमकीचं पत्र मिळाल्याचं समोर आलं आहे.

    मुंबई, 30 जून-   बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेता सलमान खाननंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करला ( Swara Bhaskar) धमकीचं पत्र मिळाल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीला आपल्या मुंबईतील वर्सोवा येथील राहत्या घरी हे पत्र मिळालं आहे. अभिनेत्रीने त्वरित पोलिसांमध्ये धाव घेत अज्ञात व्यक्ती विरोधात दखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री स्वरा भास्करला एक धमकीचं पत्र मिळालं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत विधान केल्याने अभिनेत्रीला हे पत्र मिळाल्याचं सांगितलं जात आहे. या पत्रात लिहण्यात आलं आहे, 'देशातील युवक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाहीत.. आपण फक्त आपल्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करावं.असं म्हणत या पत्रात आणखी काही आपत्तिजनक मजकूर लिहण्यात आला आहे. पत्राच्या शेवटी देशाचा युवक अशी स्वाक्षरी करण्यात आली आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने 2017  मध्ये सावरकरांबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यांनतर सोशल मीडियावर बराच वाद निर्माण झाला होता.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment

    पुढील बातम्या