Home /News /entertainment /

लसीचे दोन्ही डोस घेऊनही बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण

लसीचे दोन्ही डोस घेऊनही बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण

नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेत्री स्वरा भास्करला (Swara Bhaskar Tested Positive For Covid 19) कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

  मुंबई, 7 जानेवारी-   कोरोना व्हायरस   (Coronavirus)  पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत चालली आहे. सर्वसामान्य नागरिक असो किंवा बॉलिवूड  (Bollywood)   कलाकार सर्वांनाच कोरोनाचा जबर फटका बसला आहे. नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेत्री स्वरा भास्करला  (Swara Bhaskar Tested Positive For Covid 19)  कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियाद्वारे आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सतत आपले फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असते. ती अनेक गोष्टींवर परखडपणे आपलं मत मांडताना दिसून येते. आज अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्रीने पित्त शेअर करत लिहिलं आहे, 'नमस्कार मित्रांनो, 'ताप आणि इतर काही लक्षणे मला जाणवल्यानंतर माझी कोरोना चाचणी करण्यात आली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. कोरोना नियमाचं पालन करत आहे. ताप येणं,डोकेदुखी आणि तोंडाची चव जाणे ही याची लक्षणे आहेत. मी दोन लस घेतल्या आहेत. अपेक्षा आहे लवकरच मी ठीक होईन' असं म्हणत स्वराने चाहत्यांना माहिती दिली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

  स्वर भास्करच्या मते, तिला ५ जानेवारीपासून कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती. आरटी-पीसीआर टेस्ट नंतर मला लागण झाल्याचं स्पष्ट झाल. तेव्हापासून मी स्वतःला होम आयसोलेट केलं आहे. मी सरावानं याबद्दल कळवलं आहे. तुम्हालाही आवाहन करू इच्छिते, जो कोणी माझ्या संपर्कात आला असेल त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वांनी सुरक्षित राहा आणि डबल मास्क नक्की वापरा'. असं आवाहन स्वर भास्करने केलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood, Coronavirus, Entertainment

  पुढील बातम्या