मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /त्यांनी मला छातीचं, कमरेचं माप विचारलं; बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

त्यांनी मला छातीचं, कमरेचं माप विचारलं; बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

लिवूड   (Bollywood)  अभिनेत्री सुरवीन चावला  (Surveen Chawla)   हिने नुकताच एक खळबळजनक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने आपल्यालाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला असल्याचं सांगितलं आहे.

लिवूड (Bollywood) अभिनेत्री सुरवीन चावला (Surveen Chawla) हिने नुकताच एक खळबळजनक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने आपल्यालाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला असल्याचं सांगितलं आहे.

लिवूड (Bollywood) अभिनेत्री सुरवीन चावला (Surveen Chawla) हिने नुकताच एक खळबळजनक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने आपल्यालाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला असल्याचं सांगितलं आहे.

मुंबई, 15 डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री सुरवीन चावला  (Surveen Chawla)   हिने नुकताच एक खळबळजनक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने आपल्यालाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला असल्याचं सांगितलं आहे. एका मुलाखतीत सुरवीनने कास्टिंग काउच आणि बॉडी शेमिंगवर मोकळेपणाने संवाद साधला. तिने सांगितले आहे की एका मीटिंग दरम्यान त्याला त्याच्या शरीराच्या अवयवांच्या आकाराबद्दल कसे प्रश्न विचारण्यात आले होते.मुंबईत तिच्या पहिल्या चित्रपटाच्या भेटीदरम्यान हा प्रकार घडला होता. सुरवीनला तिचं दिसणं, वजन, कंबर आणि छातीचा आकार यावर घाणेरडे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे तिला स्वतःवरच संशय येऊ लागला होता

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सुरवीन चावला म्हणाली की दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत देखील कास्टिंग काउच होत असतं. त्याकडे लक्ष वेधत ती म्हणाली, “असे बरेच काही झाले असते. जेव्हा ती टीव्हीच्या दुनियेतून चित्रपटसृष्टीत येण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा मुंबईत तिच्या पहिल्या चित्रपट भेटीत हा प्रकार घडला होता.त्यावेळी तिला म्हटलं गेलं होतं की, 56 किलो वजनासोबत तू चित्रपटात काम कसं करणार ? यासोबतच सुरवीनने मुलाखतीत असेही सांगितले की, स्त्रीची व्याख्या करण्यासाठी हे योग्य पॅरामीटर नाही.

तसेच, सुरवीन चावलाने तिच्या मुलाखतीत कबूल केले की आता परिस्थिती बदलत आहे. कारण बॉडी शेमिंग, मानसिक आरोग्य यांसारख्या गोष्टींबद्दल पूर्वीपेक्षा जास्त उघडपणे बोलले जात आहे. ती म्हणाली कि,अशा लोकांना कसे हाताळायचे आता मी शिकले आहे.तसेच सुरवीनने सुरुवातीचा काळ आपल्यासाठी फारच कठीण असल्याचं म्हटलं आहे.

(हे वाचा:बिग बॉसच्या घरात लज्जास्पद कृत्य; अभिजित बिचकुलेनं देवोलिनाकडे मागितलं KISS )

सुरवीन चावला लवकरच अभिनेता आर माधवनसोबत नेटफ्लिक्स वेबसिरीज 'डीकपल्ड' मध्ये दिसणार आहे. ही वेबसिरीज 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'बॉम्बे फेबल्स' आणि 'आंदोलन फिल्म्स' या बॅनरखाली या शोची निर्मिती करण्यात आली आहे. याचे दिग्दर्शक हार्दिक मेहता हे आहेत. माधवन एका कादंबरी लेखक आर्याच्या भूमिकेत आणि चावला त्याची पत्नी आणि सीईओ श्रुतीच्या भूमिकेत दिसणार आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment