मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /LGBTQ मुद्द्यावरुन सुधीर मुनगंटीवारांवर भडकली सोनम कपूर, या वक्तव्यामुळे म्हणाली 'अशिक्षित'

LGBTQ मुद्द्यावरुन सुधीर मुनगंटीवारांवर भडकली सोनम कपूर, या वक्तव्यामुळे म्हणाली 'अशिक्षित'

महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांनी एलजीबीटीक्यू समुदायाबाबत विवादास्पद विधान केले होते. त्यावर अभिनेत्री सोनम कपूर हिने दिलेली प्रतिक्रिया विशेष चर्चेत आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांनी एलजीबीटीक्यू समुदायाबाबत विवादास्पद विधान केले होते. त्यावर अभिनेत्री सोनम कपूर हिने दिलेली प्रतिक्रिया विशेष चर्चेत आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांनी एलजीबीटीक्यू समुदायाबाबत विवादास्पद विधान केले होते. त्यावर अभिनेत्री सोनम कपूर हिने दिलेली प्रतिक्रिया विशेष चर्चेत आहे.

  मुंबई, 31 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते. केवळ आपले फोटो शेअर करण्यापुरता सोशल मीडियाचा वापर न करता, ती या प्लॅटफॉर्मवर सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांबाबत आपलं मतही मांडत असते. यामुळे ती बऱ्याच वेळा चर्चेत राहते, तर कित्येक वेळा ट्रोलही होते. आता पुन्हा एकदा सोनम कपूर भाजप नेते सुधीर मुनगंटीवर (BJP MLA Sudhir Mungantiwar) यांच्यावर टीका केल्यामुळे चर्चेत आली आहे. एलजीबीटीक्यू (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर) समुदायातील लोकांबाबत मुनगंटीवार (Mungantiwar on LGBTQ) यांनी केलेल्या वक्तव्यावरून सोनमने त्यांना ‘अज्ञानी आणि अशिक्षित’ म्हटलं आहे.

  काय आहे प्रकरण?

  महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांनी एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाबाबत विवादास्पद विधान केले होते. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाबाबत ते बोलत होते. या विधेयकात एलजीबीटीक्यू समुदायातील लोकांनाही विद्यापीठ बोर्डावर (LGBTQ people on University Board) येण्याची परवानगी मिळण्याबाबत सुधारणा करण्यात आली होती. यावर विरोध दर्शवत मुनगंटीवार म्हणाले, 'आता तुम्ही लेस्बियन आणि गे लोकांना विद्यापीठ समितीचे सदस्य म्हणून घेणार का? यासाठी खरं तर एक संयुक्त वैद्यकीय समितीची स्थापना करायला हवी. यात (विधेयकात) बायसेक्शुअल आणि असेक्शुअल (Mungantiwar statement about Asexual relations) संबंधांचा उल्लेख आहे. पण याची व्याख्या अद्याप कोणीच केली नाही.' एवढ्यावरच न थांबता, मुनगंटीवार पुढे म्हणाले, 'जर एखाद्या व्यक्तीचे एखाद्या प्राण्यासोबत असेक्शुअल संबंध आहेत, तर तो प्राणी येऊन सांगणार आहे का, की आमच्यात असेक्शुअल संबंध होते? काय चाललंय हे?'

  हे वाचा-रश्मी देसाईला आजही वाटते Ex Husband च्या नावाची भीती; रडताना दिसली अभिनेत्री

  अधिवेशनातील मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एलजीबीटीक्यू समुदायासोबतच इतर नेटीझन्सही त्यांच्यावर टीका करत आहेत. अभिनेत्री सोनम कपूरनेही ‘येस वुई एक्झिस्ट इंडिया’ (Yes, We exist India) या इन्स्टाग्राम पेजची पोस्ट आपल्या इन्स्टा स्टोरीवर (Sonam Kapoor Insta Story) शेअर करत मुनगंटीवार यांना ‘अज्ञानी, अशिक्षित आणि तिरस्करणीय’ (Ignorant, Illiterate & Hateful) म्हटले.

  दरम्यान, राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सभागृहात मुनगंटीवार यांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिले. 'सर्वोच्च न्यायालयाने समान संधींबाबत कित्येक निर्णय जाहीर केले आहेत. या (असेक्शुअल) मुद्द्यावरून मुनगंटीवार हे सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही या विधेयकातील सुधारणेतून काहीही नवीन करत नाहीये. देशात विविध ठिकाणी अशा प्रकारचे कायदे लागू करण्यात आलेले आहेत. आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच सुधारणा विधेयक मांडले आहे.'

  हे वाचा-2022 मध्ये जाण्यासाठी प्रियांका चोप्रा Ready! फोटो शेअर करत म्हणाली...

  भाजपचा विरोध असतानाही महाराष्ट्र सरकारने हे विधेयक विधानसभेत संमत केले होते. यानंतर ठाकरे सरकार हे पळपुटं आणि भित्रं असल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली होती.

  First published:

  Tags: Sonam Kapoor, Sudhir mungantiwar