मुंबई, 14 जुलै- बॉलिवूडची (Bollywood) मस्सकली गर्ल सोनम कपूरचा (Sonam Kapoor) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. सोनम कपूर तब्बल एक वर्षांनंतर भारतात परतली आहे आणि एयरपोर्टवर आपल्या वडिलांना म्हणजेच अभिनेता अनिल कपूरला पाहून भावुक झाली आणि अक्षरशः रडू लागली. सोनम आणि अनिल कपूर यांचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतं आहे. तर दुसरीकडे चाहते ती प्रेग्नेंट असल्याचा अंदाज लावत आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्री सोनम कपूर एयरपोर्टवर येताच तिला समजलं की, वडील तिचे वडील अनिल कपूर तिला घ्यायला एयरपोर्टवर आले, आहेत. वडिलांना समोर पाहून ती स्वतःला थांबवू नाही शकली. आणि अगदी लहान मुलीसारखा बाबा...बाबा...करत वडिलांकडे येऊ लागली. आणि वडिलांच्या जवळ येताच त्यांना मिठी मारून रडू लागली. असा हा भावुक करणारा व्हिडीओ आहे.
(हे वाचा:कंगनाच्या चित्रपटात नवाजुद्दिन सिद्दीकीची एन्ट्री; म्हणाली 'आम्हाला आमचा वाघ ... )
सोनम कपूरचा हा व्हिडीओ विरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. यावेळी सोनम कपूर खुपचं स्टाईलिश अंदाजात दिसत होती. तिने आपल्या चेहऱ्यावर मास्कसुद्धा चढवला होता. सोनम कपूर बरेच दिवस झाले चित्रपटांपासून दूर आहे. सध्या ती आपलं कौटुंबिक आयुष्य मजेत घालवत आहे. सोनमला एयरपोर्टवर पाहून काही लोकांनी ती प्रेग्नेंट असल्याचा अंदाजदेखील लावत आहेत.
(हे वाचा:सोनू सूद ते कार्तिक आर्यन; या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सोडलं होतं घर )
सोनम कपूर गेले अनेक महिने भारतातून बाहेर होती. ती लंडनमध्ये पती आनंद अहुजासोबत राहात होती. सध्या सुरु असलेली कोरोना परिस्थिती आणि पतीचा बिझनेस यामुळे ती लंडनमध्येचं राहिली होती. ती अनेक वेळा सोशल मीडियावरून पोस्ट शेयर करत आपल्याला भारताची, घराची, मित्रांची आठवण येत असल्याचं सांगत होती. आणि आज ती भारतात परतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Sonam Kapoor