सोनम आणि अर्जुन एकाच शाळेमध्ये शिकायला होते. त्यामुळे त्यांचे बालपणीचे अनेक किस्से आहेत. त्यातीलचं एक किस्सा म्हणजे सोनममुळे अर्जुनला खूप जोराचा मार पडला होता. एका मुलाखतीदरम्यान अर्जुनने सांगितलं आहे, ‘मी आणि सोनम शाळेत असताना बास्केटबॉल खेळत होतो. आम्हाला खूप आवड होती बास्केटबॉलची. एकदा असचं सोनम खेळत होती. आणि इतक्यात तिथे काही सिनियर मुले आली. त्यांनी सोनमच्या हातात्तून बॉल काढून घेतला. आणि तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागले. (हे वाचा:HBD: आपल्याच चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये नूतन यांना मिळाली नव्हती एन्ट्री, कारण.. ) त्यामुळे सोनम रडत माझ्याजवळ आली. आणि मला घडलेला प्रकार सांगितला. मी त्यावेळी खूपच लट्ठ होतो. मी रागाने त्या मुलांच्याजवळ गेलो. आणि त्याना शिवीसुद्धा दिली. त्या मुलाने माझ्याकडे रागाने बघितलं. आणि माझ्या डोळ्यावर एक जोरदार बुक्की मारली. त्यामुळे माझा डोळा अक्षरशः काळा निळा पडला होता. तो मुलगा एक स्टेट बॉक्सर होता. (हे वाचा:‘हेच का तुझे संस्कार?’ टॉपलेस फोटोसाठी ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्रीनं शिकवला धडा ) घरी आल्यानंतर सोनमने माझी अवस्था पहिली आणि मला सॉरी देखील म्हटलं होतं. मी तसा अजिबात भांडखुरा नाहीय. मात्र त्यावेळी मला खुपचं राग आला होता. यावरूनच सोनम आणि अर्जुनचं नात किती घट्ट आहे हे दिसून येत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arjun kapoor, Bollywood, Sonam Kapoor