Home /News /entertainment /

Cancer Survivors Day 2021: सोनाली बेंद्रे झाली भावुक, पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

Cancer Survivors Day 2021: सोनाली बेंद्रे झाली भावुक, पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

आज Cancer Survivors Day’ च्या निमित्ताने सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे.

  मुंबई, 6 जून-  बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood) सोनाली बेंद्रेला (Sonali Bendre) 2 वर्षांपूर्वी कॅन्सरने ग्रासले होते. यावेळी सोनाली बऱ्याच कठीण काळातून गेली आहे. न्यूयॉर्कमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. कित्येक महिन्यांच्या उपचारानंतर ती बरी झाली होती.  आज Cancer Survivors Day’ च्या निमित्ताने सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत, या कठीण काळाचा संघर्ष सांगितला आहे.
  अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आपल्या इन्स्टाग्रामवर आपला आजारपणाचा आणि आत्ताचा असा एक फोटो शेयर केला आहे. आणि त्यासोबतचं एक खास पोस्टसुद्धा लिहिली आहे. पोस्ट लिहित सोनालीने म्हटलं आहे, ‘वेळ कसा उडून जातो. जेव्हा मी मागे वळून बघते, मला माझी ताकत दिसते, मला माझा कमकुवतपणा दिसतो. मात्र महत्वाचं म्हणजे मला माझी इच्छाशक्ती दिसते. कॅन्सर वॉर्ड ठरवू शकत नाही की माझी लाईफ यानंतर कशी असेल, तुम्हाला जी लाईफ हवी आहे ती तुम्हाला स्वतः क्रिएट करावी लागेल. आयुष्याचा हा प्रवास तुम्ही कसा कराल हे तुमच्यावर असतं, यामध्ये प्रखर इच्छाशक्ती असणे खूप महत्वाचं आहे’. (हे वाचा:'या' चित्रपटासाठी आमिरने चक्क 12 दिवस केली नव्हती आंघोळ, वाचा भन्नाट किस्सा  ) अशा आशयाची पोस्ट लिहित सोनालीने आपलं मन मोकळ केलं आहे. सोनालीसाठी हा काळ खुपचं कठीण होता. सोनाली कित्येक महिने आपल्या कुटुंबापासून दूर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होती. या काळात तिला प्रचंड वेदना होतं होत्या. सोनालीचे चाहते, प्रत्येक कलाकार सोनालीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. या काळात सोनालीचे पती गोल्डी बेहेलसुद्धा तिच्या पाठीशी खंबीर उभे होते. (हे वाचा:अभिनेत्री खासदार नुसरत जहाँ 6 महिन्यांची गर्भवती? पतीशी घटस्फोटच्या देखील चर्चा  ) मायदेशी परतल्यानंतर सोनालीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं, की कॅन्सरपेक्षा भयानक उपचार होते. उपचार करताना ती किती वेदनेतून गेली आहे. हे सर्वांनी पाहिलं आहे. मात्र सौभाग्याने सोनालीने या दुर्दम्य आजारावर यशस्वी मात केली आहे. आज ती पूर्वीसारखं आपलं आयुष्य जगत आहे. सोनाली प्रत्येक कॅन्सर पीडितांसाठी तसेच इतर लोकांसाठीही एक आदर्श आहे. ज्या पद्धतीने, ज्या धाडसाने तिने या आजारावर मात केली आहे ते खुपचं कौतुकास्पद आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood actress, Instagram post

  पुढील बातम्या