पडद्यामागे एकामागोमाग एक कपडे बदलत शूट करत होती सोनाक्षी सिन्हा; VIDEO झाला व्हायरल

पडद्यामागे एकामागोमाग एक कपडे बदलत शूट करत होती सोनाक्षी सिन्हा; VIDEO झाला व्हायरल

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर नेपोटिझम विषयी मोठी चर्चा उफाळली होती. त्यात सोनाक्षीने केलेल्या वक्तव्यामुळे नेटिझन्सकडून तिच्यावर मोठी टिका करण्यात आली होती.

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा दबंग गर्ल, बुलेट क्वीन म्हणूनही ओळखली जाते. ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सलमान खानसोबत पहिल्या दबंग चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवते. पण सोनाक्षीला अभिनयात करियर करायचं नव्हतं. तिला स्टेट परफॉर्मर व्हायचं होतं.

सोनाक्षीला स्टेजवर गाणं गायचं होतं. ज्यावेळी गायनाची, गाणं म्हणण्याची संधी तिला मिळाली, तेव्हा तिने हातात माईक घेऊन ती गायलीही. सोनाक्षी अतिशय बिनधास्त मुलगी असून ती फुल ऑफ लाईफ जगते असं अनेकदा समोर आलं आहे. सोनाक्षी मुंबईच्या रस्त्यांवर बुलेट घेऊन उतरल्यानंतरही तिची सर्वत्र चर्चा होती. मध्यरात्री तिला आईस्क्रिम खाण्याची इच्छा होते. आईस्क्रिमच्या शोधात ती रात्री निघतेही. जिम करा पण खाण-पिणं सोडू नका असंही तिनं अनेकदा सांगितलं आहे.

(वाचा - Varun Natasha Wedding: शाही लग्न सोहळ्यातील PHOTO VIRAL)

अनेकदा सोनाक्षी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर लाईव्हही येते. ती अनेक विषयांवर चाहत्यांशी लाईव्ह गप्पा मारते. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर नेपोटिझम विषयी मोठी चर्चा उफाळली होती. त्यात सोनाक्षीने केलेल्या वक्तव्यामुळे नेटिझन्सकडून तिच्यावर मोठी टिका करण्यात आली होती. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून तिच्यावर टिका होत होती. त्यावेळी सोनाक्षीने तिचं ट्विटर अकाउंटही डिलीट केलं होतं. मानसिकदृष्ट्या त्रास टाळण्यासाठी तिने हे पाऊल उचचलं होतं. मात्र त्यानंतर आता सोनाक्षीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सोनाक्षीने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती एका मागून एक कपडे बदलून येताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ एका फोटोशूटमधला असल्याचं बोललं जात आहे. हा मजेशीर व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

अनेक चाहत्यांच्या व्हिडीओवर विविध कमेंट्स येत असून सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: January 25, 2021, 9:24 AM IST

ताज्या बातम्या