सोनाक्षी सिन्हाला अटक झाल्याची बातमी खरी की खोटी? समोर आला हा VIRAL VIDEO

सोनाक्षी सिन्हा हिला बेड्या घालतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर कालपासून व्हायरल झाला होता. काय आहे या व्हिडिओमागचं सत्य? पाहा हा नवा VIDEO

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 05:48 PM IST

सोनाक्षी सिन्हाला अटक झाल्याची बातमी खरी की खोटी? समोर आला हा VIRAL VIDEO

मुंबई, 7 ऑगस्ट : हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला बेड्या घालतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर कालपासून व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एका पाठमोऱ्या स्त्रीला कुणीतरी बेड्या घालत आहे असं दिसत होतं. "तुम्ही मला असं कसं अटक करू शकता? मी कोण आहे माहीत नाही का?" असं सोनाक्षी Sonakshi Sinha म्हणत असल्याचं ऐकूही येत होतं. या (Viral Video) व्हिडिओमागचं सत्य काय आहे याचा उलगडा खुद्द सोनाक्षी सिन्हानेच आज केला आहे.

सोनाक्षी सिन्हाची सध्या माध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे. कारण खानदानी शफाखाना नावाच्या तिच्या आगामी सिनेमाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये तिने आक्षेपार्ह उल्लेख केल्याने वाल्मिकी समाजात अस्वस्थता पसरली होती. या समजाच्या काही प्रतिनिधींनी सोनाक्षी सिन्हाला अटक करण्याची मागणीही केली होती.

हे वाचा : Article 370 : मोदींबद्ल ट्वीट करणं अनुराग कश्यपला पडलं महाग

या सगळ्या पार्श्वभूमीवर सोनाक्षीला अटक होतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्याने एकच खळबळ उडाली. जोरदार चर्चा सुरू झाली.

Loading...

या व्हिडिओमधलं सत्य काय, सोनाक्षीला खरंच अटक झाली का, कुणी केली अटक आणि या व्हिडिओमागे कोण आहे याची उत्तरं बुधवारी उलगडली. स्वतः सोनाक्षी सिन्हानेच या सगळ्याविषयी खुलासा केला. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून या सगळ्या कथेमागचं कारण समोर येईल आणि तुम्ही कपाळाला हात लावाल हे नक्की!

सोनाक्षीने हा व्हिडिओ शेअर करून स्पष्ट केलंय की, हे गिमिक जाहिरातीसाठी होतं. मला अटक झाली का? असं तुम्ही विचारत असाल तर त्याचं कारण हे आहे. मी इतकी छान दिसते हाच माझा गुन्हा आहे, असं मिस्कीलपणे तिने लिहिलं आहे.

हे वाचा - Article 370 : सिनेमाच्या 'या' नावासाठी निर्मात्यांची रीघ

Myglam च्या POSE या मेकअप प्रॉडक्ट्सच्या रेंजची सोनाक्षी सिन्हा ब्रँड अँबेसीडर झाली आहे. या मेकअप प्रॉडक्ट्सची जाहिरात सोनाक्षीच्या अटकेचा ड्रामा करून खुबीने करण्यात आली. पोझच्या नव्या मेकअप रेंजची ही जाहिरात आहे.

हे वाचा मलायकाला येतेय अरबाजची आठवण? शेअर केला 'हा' खास फोटो

VIDEO : ...आणि धो धो पावसात डोळ्यांदेखत ते घर पत्त्यासारखं कोसळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 05:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...