मुंबई, 9 नोव्हेंबर: बॉलिवूड ( Bollywood ) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या चर्चा राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात ( pornography case ) अटक झाल्यामुळे सुरु झाल्या होत्या. या प्रकरणात राज कुंद्रा याला सप्टेंबर महिन्यात जामीन (bail) मिळाला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात नाव येण्यापूर्वी सोशल मीडियावर ( social media ) राज कुंद्रा खूप सक्रिय होता. मात्र, या प्रकरणात नाव आल्यानंतर राजचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. तुरुंगातून बाहेर आल्यापासून तो माध्यमांसमोर सुद्धा आला नव्हता. पण नुकताच राज कुंद्रा हा त्याची पत्नी शिल्पा शेट्टी सोबत दिसला असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा तुरुंगातून परतल्यापासून मीडियापासून दूर होता. नुकताच तो पत्नी शिल्पा शेट्टी सोबत दिसला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राज कुंद्रा पहिल्यांदाच त्याच्या पत्नीसोबत कॅमेरासमोर आलाय. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
गेल्या चार महिन्यांत मनोरंजन विश्वात, त्यामध्ये प्रामुख्याने बॉलिवूडमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला जुलै महिन्यात कथित अश्लील चित्रपट निर्मिती आणि वितरण प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावरून मोठा वाद झाला. या प्रकरणात राज कुंद्रा 60 दिवस तुरुंगात होता. सप्टेंबरमध्ये राज कुंद्रा याला जामीन मंजूर झाला होता. ज्या दिवशी त्याची सुटका झाली, त्यावेळी तो निराश दिसत होता. तो माध्यमांसमोर आला नाही. आता जामीन मिळाल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या पतीसोबत विविध मंदिरात जाऊन आशीर्वाद घेत आहे, जेणेकरून या सर्व प्रकरणातून राज कुंद्राची सुटका व्हावी. नुकतेच शिल्पा शेट्टीसोबत राज कुंद्राचे मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. हिमाचलमधील ज्वालाजी देवी आणि माँ चामुंडा देवी मंदिरात जाताना शिल्पाने राजचा हात धरल्याचे फोटोत दिसत आहे.
(हे वाचा: डेटिंग अॅपवर स्वतःचं प्रोफाइल पाहून चकित झाली लारा दत्ता; VIDEO शेअर करत दिली)
शिल्पा शेट्टी हिने पती राज कुंद्रासोबत हिमाचल प्रदेशातील विविध मंदिरांमध्ये गेल्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी हिमाचल प्रदेशच्या स्थानिकांसोबत फोटो पोज दिली आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. मात्र, राज कुंद्रा या फोटो आणि व्हिडिओमधून गायब होता. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होण्यापूर्वी शिल्पा शेट्टीची काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिराची भेट चर्चेत आली होती. त्यावेळी ती एकटीच दिसत होती. यावेळी शिल्पासोबत राज आणि कुटुंबातील इतर सदस्य आहेत.पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याला जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती. माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. दोन महिन्यांपासून कुंद्रा कोठडीत होता. दोन महिन्यांनंतर त्याला जामीन मिळाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Raj kundra, Shilpa shetty