• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'ती माझी फॅशन आयकॉन'; शिल्पा शेट्टीने आईसोबतचा फोटो शेयर करत उघडलं गुपित

'ती माझी फॅशन आयकॉन'; शिल्पा शेट्टीने आईसोबतचा फोटो शेयर करत उघडलं गुपित

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास फोटो शेयर केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 2 जुलै-  प्रत्येक मुलीची पहिली फॅशन आयकॉन (Fashion Icon)  किंवा स्टाईल इन्सपीरेशन ही तिची आईच असते. बालपणापासून प्रत्येक मुलीला वाटत असतं की आपण हुबेहूब आपल्या आईसारखं दिसावं. मग ती सर्वसामन्य मुलगी असो किंवा मग एखादी अभिनेत्री. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचंसुद्धा(Shilpa Shetty) असचं आहे. तीसुद्धा आपल्या आईला आपली फॅशन आयकॉन मानते, नुकताच अभिनेत्रीने आपल्या आईचा(Mother) आणि आपला हुबेहूब फोटो शेयर करत आपल्या मनातली गोष्ट सांगितली आहे.
  बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास फोटो शेयर केला आहे. हा फोटो खास अशासाठी आहे की यामध्ये शिल्पा आणि तिची आई सुनंदा शेट्टी अगदी हुबेहूब भासत आहेत. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये शिल्पा रेट्रो लुकमध्ये दिसत आहे. आणि त्यामुळेच या दोघी मायलेकी एकसारख्याचं भासत आहेत. शिल्पाने फोटो शेयर करत आपल्या आईला आपली फॅशन आयकॉन आणि स्टाईल इन्सपीरेशन म्हटलं आहे. तसेच फोटोमध्ये आईने डोळ्यांचं जे परफेक्ट मेकअप केलं आहे, त्याचंसुद्धा शिल्पाने कौतुक केलं आहे. (हे वाचा: 'पलट' श्रुती मराठेची DDLJ स्टाईल; अभिनेत्रीचा हा VIDEO एकदा पाहाच  ) शिल्पा सध्या सोनी टीव्हीवरील ‘सुपर डान्सर 4’ मध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे. या शोमध्ये एक रेट्रो एपिसोड ठेवण्यात आला आहे. आणि त्यासाठीचं सर्वांनी रेट्रो लुक केला आहे. शिल्पाने ब्लॅक अँड व्हाईट रंगाची डॉट असणारी साडी परिधान केली आहे. तसेच तिला साजेशी अशी जुन्या अभिनेत्रींसारखी हेयरस्टाईलसुद्धा केली आहे. आणि म्हणूनचं सर्वांना ब्लॅक अँड व्हाईट काळात गेल्याचा भास होतं आहे. शिल्पासोबतचं अनुराग बासू आणि गीता मांने सुद्धा रेट्रो लुक केला आहे. या एपिसोडमध्ये अभिनेता अनु कपूरची उपस्थिती असणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: