• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • डाएट-बिएट राहिलं बाजूला; शिल्पा शेट्टीनं जिलेबी-रबडीवर मारला ताव; VIDEO VIRAL

डाएट-बिएट राहिलं बाजूला; शिल्पा शेट्टीनं जिलेबी-रबडीवर मारला ताव; VIDEO VIRAL

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सतत आपल्या फिटनेसबाबत सजग असते. मात्र आता तिनं थोड्या वेळासाठी हे रूटिन बाजुला ठेवल्याचं दिसतं आहे.

 • Share this:
  मुंबई, 7 फेब्रुवारी : बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood actress) शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ओळखली जाते ती तिच्या फिटनेससाठी (fitness). कधी काय खायचं-प्यायचं, कुठला व्यायाम कधी किती काळ करायचा याबाबत ती अतिशय काटेकोर असते. शिल्पा नियमितपणे आपले फिटनेस व्हिडिओ (fitness video) विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर (social media platforms) शेअर करत असते. चाहतेसुद्धा (fans) शिल्पाचे फिटनेस व्हिडिओ, योगा व्हिडिओ कधी येतात याची आतुरतेनं वाट पाहत असतात. शिल्पा सतत सगळ्यांना फिटनेससाठी मोटिव्हेट (motivate) करत असते. मात्र आता शिल्पानंच जणू फिटनेस फ्रिक लोकांना संभ्रमात टाकलं आहे.
  एक असा पदार्थ शिल्पाच्या समोर आला, की ती एकाएकी डायट, फिटनेस सगळंच विसरली. त्याचं झालं असं, की शिल्पाला तिच्या एका जवळच्या व्यक्तीनं जिलबी (Jalebi) आणि गुळाची रबडी (Rabadi) पाठवली. शिल्पानं या दोन्ही पदार्थांवर मजबूत ताव मारला. शिल्पानं केवळ या पदार्थांचा आस्वाद घेतला नाही तर याचा व्हिडिओही इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला. या व्हिडिओत शिल्पा म्हणते आहे, की 'अरे, आज तर रविवार आहे!' इतकं बोलून शिल्पा या पदार्थांचा मनसोक्त आनंद घेऊ लागते हे या व्हिडिओत दिसतं. केवळ 3 तासात हा व्हिडिओ तब्बल 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. शिल्पाचे चाहते या व्हिडिओवर विविध प्रकारच्या मस्त प्रतिक्रिया देत आहेत. शिल्पा लवकरच 'निकम्मा' या सिनेमात दिसणार आहे. यात शिल्पासोबत भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी आणि सिंगर शर्ले सेतिया हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. याशिवाय शिल्पा अभिनेता परेश रावल (Paresh rawal) आणि मिजान जाफरी यांच्यासह 'हंगामा २' या सिनेमातही दिसणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: