मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अश्लील व्हिडिओ प्रकरणात शर्लिन चोप्रावर अटकेची टांगती तलवार; काय आहे नेमकं प्रकरण?

अश्लील व्हिडिओ प्रकरणात शर्लिन चोप्रावर अटकेची टांगती तलवार; काय आहे नेमकं प्रकरण?

 गेल्या वर्षी शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) तिच्या काही बोल्ड व्हिडिओंमुळे (Bold Videos) अडचणीत सापडली होती. तिने पॉर्नोग्राफिक वेबसाइटवर अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याचा तिच्यावर आरोप आहे.

गेल्या वर्षी शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) तिच्या काही बोल्ड व्हिडिओंमुळे (Bold Videos) अडचणीत सापडली होती. तिने पॉर्नोग्राफिक वेबसाइटवर अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याचा तिच्यावर आरोप आहे.

गेल्या वर्षी शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) तिच्या काही बोल्ड व्हिडिओंमुळे (Bold Videos) अडचणीत सापडली होती. तिने पॉर्नोग्राफिक वेबसाइटवर अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याचा तिच्यावर आरोप आहे.

मुंबई, 19 फेब्रुवारी: बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) नेहमी कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. अलीकडेच ती पॉर्न व्हिडिओ प्रकरणामुळे (Porn Videos Case) चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी शर्लिन चोप्रा तिच्या काही बोल्ड व्हिडिओंमुळे (Bold Videos) अडचणीत सापडली आहे. तिने पॉर्नोग्राफिक वेबसाइटवर (Pornographic Websites) अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याचा तिच्यावर आरोप आहे. शर्लिनने आपल्या अर्जात असं म्हटलं आहे की, संबंधित अश्लील सामग्री तिने सबस्क्रिप्शन बेस्ड आंतरराष्ट्रीय पोर्टलसाठी दिली होती. पण ती पायरसीला बळी पडली आहे. याप्रकरणात शर्लिनने अटकपूर्व जामीनासाठी (Anticipatory Bail) अर्ज केला होता, पण सत्र न्यायालयाने तिची याचिका फेटाळली होती.

शेर्लिनसाठी दिलासादायक बातमी अशी की, तिला सोमवारपर्यंत अटक करता येणार नाही. सोमवारीपर्यंत तिच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासनही पोलिसांनी न्यायालयासमोर दिलं आहे. गेल्या वर्षी सेवानिवृत्त अधिकारी मधुकर केनी यांनी शेर्लिनविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनी दावा केला होता की, जेव्हा जेव्हा शर्लिनचं नाव सर्च इंजिनवर लिहिलं जातं, तेव्हा अश्लील सामग्री दिसते. या आधारे शर्लिनविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा-कोण आहेत पायल नाथ? जिच्यापासून ओमर अब्दुल्लांना हवाय लवकरात लवकर घटस्फोट

शर्लिनवर आयटी अ‍ॅक्ट 2000 च्या कलम 67 आणि 67 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी अटकेपासून वाचण्यासाठी शर्लिनने मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती, परंतु तेथे तिचा अंतरिम जामीन फेटाळण्यात आला होता. यानंतर आता शर्लिनने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. यावर  22 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तिला अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे.

शर्लिनच्या म्हणण्यानुसार ती दोन कंपन्यांची संचालक आहे. याव्यतिरिक्त, ती अडल्ट वेबसाइटसाठी सामग्रीही तयार करते. FIR मध्ये नमूद केलेल्या वेबसाइटमध्ये पायरेटेड सामग्री आहे. ज्यामध्ये कॉपीराइटचं उल्लंघन करण्यात आलं आहे. कारण ती केवळ सब्सक्रिप्शन बेस्ड वेबसाईट्सलाच सामग्री देते. पण काहीजण तेथून तेथून व्हिडिओ डाऊनलोड करतात आणि वॉटरमार्क काढून वापरकर्त्यांसाठी विनामूल्य उपलब्ध करुन देतात.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress