• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अभिनेत्री शर्मिला टागोर आणि सोहा अली खान करणार आपल्या खाजगी वस्तूंचा लिलाव, पाहा काय आहे कारण

अभिनेत्री शर्मिला टागोर आणि सोहा अली खान करणार आपल्या खाजगी वस्तूंचा लिलाव, पाहा काय आहे कारण

शर्मिला टागोर (sharmila tagore) आणि सोहा अली खान (soha ali khan)‘मदर्स डे’(Mother's Day) च्या निमित्ताने एका सामाजिक कार्यासाठी आपल्या खाजगी वस्तूंचा लिलाव(Auction) करण्याचा निर्णय घेतला आहे.

 • Share this:
  मुंबई, 9 मे : इतर कलाकारांप्रमाणे ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) आणि अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) यांनी सुद्धा एक चांगल्या कामासाठी पुढाकार घेतला आहे. या आई आणि मुलीने ‘मदर्स डे’(Mother's Day) च्या निमित्ताने एका सामाजिक कार्यासाठी आपल्या खाजगी वस्तूंचा लिलाव (Auction) करण्याचा निर्णय घेतला आहे. या लिलावातून मिळणाऱ्या पैशांचा वापर ते जनावरांच्या संवर्धनासाठी आणि पर्यावरण संवरक्षाणासाठी वापरणार आहेत. मदर्स डे म्हणजे 9 मे ला हा लिलाव करण्यात येणार आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, सोहाने याबद्दल बोलताना म्हटलं आहे, ‘गेल्या काही वर्षांत मला आपली माणस आणि त्यांचं प्रेम काय असत, हे लक्षात आलं आहे. आणि त्याची योग्य जाणीव झाली आहे. मला लक्षात आलं आहे. की आयुष्यात काय आवश्यक आहे’.
  View this post on Instagram

  A post shared by Soha (@sakpataudi)

  सोहाने पुढ म्हटलं आहे, भलेही आपण सध्या आपल्या घरामध्ये बंदिस्त असू, मात्र सहकार्य करण्यासाठी आपण कोणताही मार्ग शोधू शकतो. आम्ही आमच्या वस्तू विकायचा निर्णय यासाठी घेतला आहे, कारण त्यातून येणारे पैसे आम्ही पतौडी ट्रस्टला पाठवणार आहोत. आणि तेथून ते एका सामाजिक संस्थेसाठी देण्यात येणार आहेत. (हे वाचा:सोनू सूदला बसला मानसिक धक्का; अथक प्रयत्नानंतरही नाही वाचू शकले मुलीचे प्राण  ) सोहा अली खान शेवटी 2018 मध्ये ‘साहेब बिवी और गेंगस्टर’ या चित्रपटात दिसून आली होती. बऱ्याच दिवसांपासून सोहा चित्रपटांपासून दूर आहे. ती सध्या आपली मुलगी आणि पती अभिनेता कुणाल खेमू सोबत वेळ घालवत आहे. (हे वाचा: संजय आणि सुनील दत्त यांच्यात होतं सोशल डिस्टन्स? रिकाम्या खुर्चीनं वेधलं लक्ष ) ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी सुद्धा या लिलावाबद्दल सांगितलं आहे, त्यांनी म्हटलं आहे, ‘आम्ही या मिळणाऱ्या पैशातून प्राण्यांसाठी आणि पर्यावरणासाठी काहीतरी चांगलं करू इच्छितो. आणि लोक नवीन वस्तू खरेदी करण्यापेक्षा जेव्हा प्री युज वस्तू वापरण, ते पर्यावरणासाठीही चांगलं असतं’. बऱ्याच वर्षांपासून चित्रपटांपासून दूर असणाऱ्या शर्मिला टागोर सध्या पतौडी पॅलेसमध्ये राहतात. त्या एक अभिनेत्री असण्यासोबतच सेन्सोर बोर्डच्या अध्यक्षा देखील होत्या. सोहा आणि शर्मिला टागोर यांनी कॉकटेल ड्रेस, पश्मीना म्हणजेच विविध लोकरीचे कपडे, अरमानी आणि टी-शर्ट यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: