मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कुटुंबियांनी सोडली साथ, उपचारासाठीही नाहीत पैसे; अभिनेत्रीची झालीय बिकट अवस्था

कुटुंबियांनी सोडली साथ, उपचारासाठीही नाहीत पैसे; अभिनेत्रीची झालीय बिकट अवस्था

नदिया के पार, निशांत, नजराना, बेटा हो तो ऐसा यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे.

नदिया के पार, निशांत, नजराना, बेटा हो तो ऐसा यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे.

नदिया के पार, निशांत, नजराना, बेटा हो तो ऐसा यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 14 जुलै- असं म्हटलं जातं की वाईट वेळ कधीचं सांगून येत नाही. आयुष्यात सुख आणि दुख दोन्ही गोष्टी माणसांना बघाव्या लागतात. मात्र खरा वाईट काळ तेव्हा जाणवू लागतो, जेव्हा आपलीचं लोक आपल्याकडे पाठ फिरवतात. अभिनेत्री शगुफ्ता अली नंतर आत्ता ‘नदिया के पार’ (Nadiyan Ke Paar) फेम ज्येष्ठ अभिनेत्री सविता बजाजसुद्धा (Savita Bajaj) आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. कोरोना महामारी आणि त्यानंतर आलेलं आजारपण यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकताच त्यांनी म्हटलं आहे, की त्यांच्याजवळ असलेली सर्व मिळकत आत्ता संपली आहे, इथून पुढे उदरनिर्वाह करनं कठीण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

" isDesktop="true" id="579204" >

नदिया के पार, निशांत, नजराना, बेटा हो तो ऐसा यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. तसेच नुक्कड, मायका, कवच यांसारख्या मालिकांमध्येही त्या दिसून आल्या होत्या. मात्र त्यांना थोडासाही अंदाज नव्हता की वृद्धपणी त्यांच्यावर अशी काही वेळ येईल. त्यांनी नुकताच ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे, त्यांच्याकडे उदरनिर्वाह करण्यासाठी आत्ता पैसेच शिल्लक नाहीत. त्यांनी आपली सर्व मिळकत आपल्या आजारपणावर खर्च केली आहे. एका आजारपणातून निघाल्यानंतर त्यांना दुसऱ्या आजाराने जखडले होते. अशी काहीशी त्यांची अवस्था आहे.

(हे वाचा:वडील अनिल कपूरला पाहून हुंदका देऊन रडू लागली सोनम; VIDEO झाला VIRAL  )

सविता बजाज यांनी म्हटलं आहे, ‘त्यांना रायटर्स असोसिएशन आणि सिने एंड टेलिव्हिजन आर्टस्टकडून काही मदत मिळत आहे. त्यावरच त्या आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यांना या दोन्ही संस्थेकडून अनुक्रमे 2 हजार आणि 5 हजार रुपये दिले जातात. यावरचं त्या आपलं आयुष्य जगत आहेत. पुढे त्या म्हणाल्या मात्र वृद्धपणाने वाढत्या आजारांनी ही रक्कम पुरेशी होत नाहीय, त्यामुळे जगन कठीण झालं आहे’.

(हे वाचा: कंगनाच्या चित्रपटात नवाजुद्दिन सिद्दीकीची एन्ट्री; म्हणाली 'आम्हाला आमचा वाघ ...)

तसेच त्यांनी सांगितल की, ‘त्यांनी 25 वर्षांपूर्वी आपल्या शहरात म्हणजेच दिल्लीत परत जायचं. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरी ठेवून घेण्यास नकार दिला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांनी खूप पैसा मिळवला, खूप लोकांना मदत केली आहे. आत्ता स्वतः चं स्वतः चा सांभाळ कर म्हणत त्यांची साथ सोडून दिली होती. मात्र त्या म्हणाल्या की आत्ता वेळ अशी आहे की मलाच मदतीची गरज आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News