Home /News /entertainment /

अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं सारा अली खानला पडलं महागात; नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं सारा अली खानला पडलं महागात; नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

साराच्या या एका ट्विटनंतर काही वेळातच साराबद्दल ट्विटरवर मीम्सचा महापूर आला आहे.

    मुंबई,22ऑक्टोबर- बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री सारा अली खान(Sara Ali Khan) आज रणवीर सिंगच्या 'द बिग पिक्चर' या रिअॅलिटी गेम शोमध्ये धमाल करताना दिसणार आहे, ज्यामुळे ती चर्चेत आहे. पण या व्यतिरिक्त एका ट्विटसाठी तिला खूप ट्रोल केलं जात आहे. साराच्या या ट्विटचे कनेक्शन देशाचे गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांच्याशी निगडित आहे. अमित शाहच्या वाढदिवशी सारा ज्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देत होती. त्यावरून सोशल मीडियावर असं म्हटलं जात आहे, सारा भविष्यकाळात NCB पासून वाचण्यासाठी ही उलाढाल करत आहे. काय होतं साराचं ट्विट- खरं तर, सारा अली खान इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे, परंतु ती ट्विटरवर फारशी सक्रिय नसते. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त साराने एक ट्विट केलं आहे, जे साराचं 5 वं ट्विट होतं. या ट्विटमध्ये तिने लिहिलं आहे,- 'देशाचे गृहमंत्री अमित शहा जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.' साराच्या या एका ट्विटनंतर काही वेळातच साराबद्दल ट्विटरवर मीम्सचा महापूर आला. सोशल मीडिया वापरकर्त्यांना असं वाटतं की साराने हे केवळ त्यांना खुश करण्यासाठी केलं आहे. वास्तविक, लोक या ट्विटला ड्रग प्रकरणाशी जोडत आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात एनसीबीने सारा अली खानला चौकशीसाठी बोलावलं होतं. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या या लाडक्या लेकीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ती अखेरची वरुण धवनसोबत कुली नंबर 1 या चित्रपटात दिसली होती. आता सारा अली खान लवकरच 'अतरंगी रे' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि धनुषसोबत झळकणार आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Amit Shah, Sara ali khan

    पुढील बातम्या