मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'लोका सांगे ब्रम्हज्ञान अन् स्वत:...' विनामास्क फिरणाऱ्या सारा अली खानला केलं ट्रोल

'लोका सांगे ब्रम्हज्ञान अन् स्वत:...' विनामास्क फिरणाऱ्या सारा अली खानला केलं ट्रोल

अलीकडेच साराला मुंबईतील एका जिमच्या बाहेर स्पॉट (sara ali khan spotted near gym) करण्यात आलं आहे. यावेळी तिने एक चूक केली होती, ज्यामुळे तिला आता नेटकऱ्यांच्या ट्रोलचा सामना करावा लागत आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 एप्रिल: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आपल्या फिटनेसाठी (Fitness) ओळखली जाते. आपल्या फिटनेसबाबत ती खूपच गंभीर आहे. तिने बर्‍याचदा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून 'फॅट टू फिट' (Fat To Fit) जर्नीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, साराने स्वतः ला फिट ठेवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे. कोरोनामुळे अनेकांचं दैनंदिन वेळापत्रक ढासळलं आहे. पण सारा तिच्या फिटनेसवर पूर्णपणे लक्ष देताना दिसत आहे. अलीकडेच तिला मुंबईतील एका जिमच्या बाहेर स्पॉट (Sara ali khan spotted near gym) केलं गेलं आहे. परंतु यावेळी तिने एक चूक केली होती, ज्यामुळे तिला आता ट्रोल केलं जात आहे.

अलीकडेच सारा अली खान वर्क आऊट करण्यासाठी जिममध्ये पोहचली होती. तिचे काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये सारा अली खान मास्कशिवाय दिसत आहे. सारा जिममधून बाहेर पडल्यानंतर काही फोटोग्राफर्स तिच्याकडे फोटो काढण्यासाठी जाऊ लागले. पण साराने जोरात ओरडून जवळ न येणास सांगितलं. यावेळी सारा ओरडून म्हणाली की,  "माझ्या जवळ येऊ नकोस." मास्क परिधान न केल्यामुळे (Sara Ali Khan not wearing mask at gym) साराने पापाराझी फोटोग्राफरला जवळ येण्यास रोखलं आहे.

साराचा हा फोटो विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. तिचा हा फोटो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मास्क परिधान न केल्यानं अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अनेक युजर्सनी या फोटोवर प्रतिक्रिया देत साराला ज्ञानाचे डोस पाजले आहेत. तर अनेकांनी तिला सकारात्मक सल्लेही दिले आहेत.

हे ही वाचा- सारा अली खानला भिकारी समजून लोकांनी दिली होते पैसे, मजेशीर VIDEO व्हायरल

या फोटोवर एका नेटकऱ्यानं लिहिलं की, 'सारा अली खान दुसऱ्यांना मास्क परिधान करण्याची आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा सल्ला देते. शिवाय विनाकारण घराच्या बाहेर पडू नका असा सल्लाही देते.' असा टोमणा एका नेटकऱ्याने लगावला आहे. तर एका वापरकर्त्यानं उपरोधिकपणे विचारलं की, 'मास्क कुठे आहे दीदी!' तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतं असून वापरकर्ते अनेक मजेदार कमेंट करताना दिसत आहेत.

First published:

Tags: Corona, Mask, Sara ali khan, Social media troll, Viral photo