ऐन गरमीत सारानं वाढवला पारा; ऑरेंज बिकिनीत फोटो शेअर करत म्हणाली...

ऐन गरमीत सारानं वाढवला पारा; ऑरेंज बिकिनीत फोटो शेअर करत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा (sara ali khan) हा फोटो पाहून सोशल मीडियावरील तापमान वाढलं आहे.

  • Share this:

मुंबई, 04 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Saif Ali Khan) सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच अॅक्टिव्ह असते. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा अली खान नेहमी सोशल मीडियावर सुंदर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. सारा अली खानच्या या फोटोंना देखील तिच्या चाहत्यांकडू चांगली पसंती मिळत असते. नुकताच सारा अली खाननं सोशल मीडियावर एक बोल्ड फोटो (Bold Photos) पोस्ट केला आहे. या फोटोमुळे ती चर्चेत आली असून तिच्या फोटोंनी सोशल मीडियावरील तापमान चांगलंच वाढलं आहे.

सारा अली खाननं नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हॉट आणि बोल्ड फोटोंज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सारा अली खान ऑरेंज कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. या बिकिनीमध्ये सारा समुद्र किनाऱ्यावर आपली बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत सारा अली खाननं सुंदर कॅप्शन सुद्धा दिलं आहे. तिने हे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये' व्हिटॅमिनCचा डेली डोस' #vitaminc #vitaminsea,असं लिहिलं आहे.

सारा अली खानचे हे फोटो पाहून असं वाटतंय की तिचे हे फोटो गोवा किंवा मालदीव व्हेकेशनदरम्यानचे असावेत. सारा अली खानचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सारा अली खानच्या या सिझलिंग अवताराला तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. तिच्या या फोटोंना 1कोटींपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर तिच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करत तिच्या फोटोंचं कौतुक केलं आहे.

सारा अली खानची बिकिनीमधील फोटो शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील तिनं बिकीनीतील अनेक फोटो शेअर केले आहेत.

हे वाचा - सुष्मिता सेनपेक्षाही हॉट आहे तिची वहिनी; चारू असोपाचे Bold Photo व्हायरल

काही दिवसांपूर्वी सारा अली खाननं आपली आई अभिनेत्री अमृता सिंगसोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. सारा आईसोबत अजमेरमधील ख्वाजा गरीब नवाजच्या दर्ग्यामध्ये गेली होती. त्याठिकाणी तिने हे फोटो काढले होते. सारा ईश्वर आणि अल्लाह दोघांवर खूप विश्वास ठेवते. ती कधी आपल्या आईसोबत मंदिरात तर कधी दर्ग्यामध्ये जाते.

हे वाचा - या फोटोतला गोंडस मुलगा ओळखलात का? आता आहे मराठीतला चॉकलेट हिरो

सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर सारा नुकतीच अभिनेता वरुण धवनसोबत 'कुली नंबर1' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पण या चित्रपटाला प्रेक्षकांवर जादू करण्यात यश आलं नाही. सारा लवकरच'अतरंगी रे' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सारासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद. एल राय यांनी केलं आहे.

First published: March 4, 2021, 11:34 PM IST

ताज्या बातम्या