मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: लहानग्या साराने KBC च्या सेटवर क्युट अंदाजात केलं होतं बिग बीना आदाब !

VIDEO: लहानग्या साराने KBC च्या सेटवर क्युट अंदाजात केलं होतं बिग बीना आदाब !

सारा अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)  आणि अभिनेत्री अमृतासिंग (Amrita Singh)  यांची मुलगी आहे.

सारा अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री अमृतासिंग (Amrita Singh) यांची मुलगी आहे.

सारा अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री अमृतासिंग (Amrita Singh) यांची मुलगी आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 2 जून-  अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) तीन वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. अगदी कमी कालावधीतच साराने चाहत्यांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. सारा ही अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)  आणि अभिनेत्री अमृतासिंग (Amrita Singh)  यांची मुलगी आहे. ती फिल्मी वातावरणातच मोठी झाली आहे. सारा छोटी असताना बऱ्याचदा तिच्या आई-वडिलांसोबत शुटिंगसाठी जायची. साराचा अशाच एका  सेटवरील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega crorepati) शोच्या सेटवरचा.
सारा तिच्या वडिलांसोबत या शोमध्ये गेली होती. या व्हिडिओत छोटीशी सारा खूपच क्यूट दिसतीए. बिग बी देखील तिच्या क्युटनेसचे फॅन झाले आहेत. सारा छोटी असताना तिचं वजन जास्त होतं. त्यामुळे ती अगदी गुटगुटीत दिसायची. या व्हिडिओत तर तिला तुम्ही ओळखू देखील शकणार नाही.  गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन यांचा फेमस शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या (Kaun Banega crorepati) सेटवरील एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडिओत सैफ अली खान आणि प्रीती झिंटा स्पर्धक म्हणून अमिताभ यांच्यासमोर हॉट सीटवर बसलेले दिसत आहेत. यावेळी छोटी सारादेखील तिच्या एका मैत्रिणीसोबत सेटवर आली होती. तिला अमिताभ विचारतात, ‘तू कशी आहेस? लहानगी सारा म्हणते मी एकदम ठीक आहे. नंतर अमिताभ तिला आदाब करण्यास सांगतात. क्युटशी सारा अगदी प्रेमाने बिग बींना आदाब करते आणि बिग बीदेखील तिला आदाब करतात. त्यानंतर ते साराला मैत्रिणीबद्दल विचारतात. तेव्हा सारा म्हणते मी माझी मैत्रिण पश्मिनासोबत आली आहे. बिग बी पश्मिनासोबत बोलतात आणि खेळ पुढे नेत सैफ आणि प्रीतीला प्रश्न विचारतात असं या व्हिडिओत दिसतंय.
या व्हिडिओमध्ये लहान असलेली सारा बॉलिवूडमध्ये चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. साराने 2018 मध्ये अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर सारा सिम्बा, डेविड धवन यांच्या 'कुली नंबर 1' चित्रपटातही झळकली होती. या फिल्ममध्ये अभिनेता वरूण धवन होता. याशिवाय सारा 'अतरंगी रे' चित्रपटात काम करत आहे.
First published:

Tags: Entertainment, Sara ali khan

पुढील बातम्या