मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: सारा अली खानच्या बॉडीगार्डनं केलं असं काही... अभिनेत्रीला मागावी लागली माफी

VIDEO: सारा अली खानच्या बॉडीगार्डनं केलं असं काही... अभिनेत्रीला मागावी लागली माफी

  बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड  (Stars Bodyguard)  शेरा असो किंवा शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी असो, बॉलिवूड स्टार्सचे सुरक्षा रक्षक अनेकदा चर्चेत असतात. मात्र सोमवारी सारा अली खानच्या   (Sara Ali Khan)  सुरक्षा रक्षकाने असे कृत्य केले की, त्याबद्दल सारालाच माफी मागावी लागली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 30 नोव्हेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड  (Stars Bodyguard)  शेरा असो किंवा शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी असो, बॉलिवूड स्टार्सचे सुरक्षा रक्षक अनेकदा चर्चेत असतात. मात्र सोमवारी सारा अली खानच्या   (Sara Ali Khan)  सुरक्षा रक्षकाने असे कृत्य केले की, त्याबद्दल सारालाच माफी मागावी लागली. साराने सर्वांसमोर माफी मागणे तिच्या चाहत्यांना फारच भावले असून अभिनेत्रीच्या या स्टाइलचे सोशल मीडियावर कौतुकही होत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही  (Viral Video)  समोर आला आहे. चला तर पाहू या काय आहे ही संपूर्ण घटना...

वास्तविक सोमवारी सारा तिच्या आगामी 'अतरंगी रे' या चित्रपटातील 'चका चक' या पहिल्या गाण्याच्या लाँचिंगला पोहोचली होती. या गाण्यात सारा जबरदस्त स्टाइलमध्ये शरारा घालून डान्स करताना दिसत आहे. या लाँचच्या निमित्ताने सारा इव्हेंटमध्ये डान्स करताना आणि मस्ती करताना दिसली. कार्यक्रम संपल्यानंतर सारा तिच्या कारजवळ जात होती आणि आजूबाजूला उभ्या असलेल्या मीडिया कर्मचार्‍यांना ती कोणाला पाडलं, ते 'कुठे आहेत , कुठे आहेत, ' असं विचारत असल्याचे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात दिसून दिसून येत आहे.यावेळी सर्वजण साराला सांगू लागतात.

" isDesktop="true" id="636982" >

तेव्हा सारा पुन्हा म्हणते. ज्यांना पाडलं ते गेले. आणि त्यांनतर  सुरक्षा रक्षकांना समजावते. कृपया असं परत नका करू. कृपा करून कधीही कोणालाही धक्का नका देऊ. इतकंच  स्वतः आपल्या बॉडिगार्डच्यावतीने माफी मागते. आणि असं परत नाही होणार असं आश्वासन देते. या प्रकरणावर नेटिझन्स साराचे खूप कौतुक करत आहेत. अनेक लोक अभिनेत्रीला 'स्वीट' म्हणत आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ खाली पाहू शकता.

सारा अली खान धनुष आणि अक्षय कुमारसोबत 'अतरंगी रे' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सारा ही बिहारी मुलगी बनली आहे जिचा तामिळ मुलगा धनुषसोबत जबरदस्तीने विवाह होतो. या चित्रपटाच्या रिलीज झालेल्या पहिल्या गाण्यात सारा तिच्याच नवऱ्याच्या म्हणजेच धनुषच्या लग्नात मस्ती करताना दिसत आहे. अतरंगी रे 24 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Sara ali khan