मुंबई, 2 फेब्रुवारी- मनोरंजनसृष्टी आणि त्यातील ग्लॅमरस लाईफ पाहून अनेकांना या क्षेत्राचा मोह आवरत नाही. पण या झगमगाटीमागे एक वेगळंच वास्तव दडलेलं आहे. जे फारसं कधी समोर येत नाही. याठिकाणी काही आवाज दाबले जातात तर काहींना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील समस्यांबद्दल बोलायचे नसते. पण अलीकडेच अभिनेत्री समीरा रेड्डीने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांतील घटनांवर खुल्लमखुल्ला संवाद साधला आहे. पाहायला गेलं तर बहुतांश अभिनेत्रींना याच परिस्थितीतून जावं लागत. पण करिअर आणि इंडस्ट्रीच्या दबावापुढे त्यांचा पराभव होतो. असं भयानक सत्य तिने पुन्हा एकदा जगासमोर ठेवलं आहे.
मनोरंजनसृष्टीत मध्ये मोजक्याच अभिनेत्री अशा आहेत ज्या धाडसाने पुढे येत या क्षेत्रातील वास्तव जगापुढे मांडतात. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे समीरा रेड्डी होय. धाडशी अभिनेत्रींमध्ये समीराची गणना होते. ती नेहमीच आपलं म्हणणं अतिशय स्पष्टपणे सर्वांसमोर मांडते. समीराने 2002 मध्ये सोहेल खानसोबत 'मैंने दिल तुझको दिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या पहिल्याच चित्रपटातून समीरा चर्चेत आली होती. समीराने नुकतंच मिडडेशी संवाद साधताना सांगितले की पडद्यामागे अभिनेत्रींवर त्यांचा लूक बदलण्यासाठी कसा दबाव आणला जातो. तिलाही या टप्प्यातून जाव लागल आहे आणि ते खूप त्रासदायक असल्याचंही अभिनेत्रीने सांगितलं.
या रिपोर्ट्सनुसार, समीरा म्हणाली की, तिला अनेक वेळा इडली खाऊन जगावं लागत होतं, जेणेकरून तिला परफेक्ट लूक मिळू शकेल. या मुलाखतीत अभिनेत्रीने असंही सांगितल की, '10 वर्षांपूर्वीपर्यंत बॉलिवूडमध्ये प्लास्टिक सर्जरीचं वेड सुरु होतं. आपल्या लूकमध्ये बदल करण्यासाठी हाडांची रचना, नाक आणि स्तनाच्या कामावर भर देण्यात येत होता. माझ्यासुद्धा फिगरबाबत आक्षेप असल्याने मला शस्त्रक्रिया करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यामुळे मला सतत ब्रेस्ट पॅड्स लावावे लागले. हे सर्व करताना मला वाटायचं की, हे का करायचं?
View this post on Instagram
समीरा पुढे म्हणाली, 'असे अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या प्लास्टिक सर्जरी करतात आणि ही त्यांची चॉईस आहे. त्यात ते सुखी असतील तर ठीक आहे. जगा आणि जगू द्या यावर माझा विश्वास आहे. कोणाला न्याय देणारे आपण कोण?असं म्हणत अभिनेत्रीने आपलं मत स्पष्ट केलं आहे.
सध्या पडद्यापासून दूर असणारी समीरा रेड्डी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समीरा आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. ती सतत आपले फॅमिली फोटो शेअर करत असते. तसेच समीरा सतत बॉडी शेमिंगसारख्या विषयांवरसुद्धा स्पष्टपणे बोलत असते. आपण जस आहोत तसं स्वतः ला स्वीकारण्याचा सल्ला अभिनेत्री चाहत्यांना देते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment