संभावनाने नुकताच आपल्या सोशल सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्याचा पती अविनाशने लिहिलं आहे. आज सायंकाळी 5.37 ला संभावनाने आपल्या वडिलांना कोरोना आणि नंतर आलेल्या कार्डीयाक अटकने गमावलं आहे. कृपा करून त्यांच्या वडिलांनाच्या शांतीसाठी प्रार्थना करा’. अशा आशयची पोस्ट संभावनाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. काही दिवसांपूर्वी संभावनाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीमधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांनतर त्यांना कार्डीयाक अरेस्टचा अटेक आला. त्यातच त्यांचं निधन झालं. संभावना सुद्धा कोरोना काळामध्ये गरजूंसाठी मदत करत आहे. (हे वाचा:सोनू सूदला बसला मानसिक धक्का; अथक प्रयत्नानंतरही नाही वाचू शकले मुलीचे प्राण ) नुकताच संभावनाने ऑक्सिजन आणि औषधांच्या बाबतीत होणाऱ्या काळ्याबाजारा विरुद्ध आवाज उठवला होता. संभावना बऱ्याच वेळा सामाजिक कार्यांमध्ये सहभागी कझालेली दिसून येते. यात तिचा पती अविनाश द्विवेदी सुद्धा तिच्यासोबत असतो. (हे वाचा:'बिग बॉस' फेम अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक; कारण ऐकून व्हाल थक्क ) संभावना सेठ एक उत्तम डान्सर,अभिनेत्री आणि होस्ट सुद्धा आहे. संभावनाने काही चित्रपटांनामध्ये आयटम सॉंग सुद्धा केले आहेत. तसेच संभावना सेठ लोकप्रिय शो बिग बॉसचा सुद्धा भाग होती. ती बिग बॉसच्या दुसऱ्या भागाची स्पर्धक होती. यामध्ये तिला चांगलीच प्रसिद्धी देखील मिळाली होती. फक्त हिंदीच नव्हे तर अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये सुद्धा तिनं काम केलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.