1994 मध्ये आलेल्या “हम आपके हैं कौन” या सिनेमात “रेणुका शहाणे”, यांनी“निशा” च्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती. निशाच्या भूमिकेत माधुरी दीक्षित होती. या सिनेमात सलमान खान देखील होता. बॉलिवूडमधील मोठ्या स्टारसोबत रेणुका शहाणे यांनी काम केलं आहे.आता रेणुका सहाणे छोट्या पडद्यावर झी मराठीचा नवीन शो होस्ट करताना दिसणार असल्याचे नक्की झालं आहे. त्यांच्यासोबत पुष्कराज चिरपुटकर (Pushkraj Chirputkar) देखील हा शो होस्ट करताना दिसणार असल्याची समोर आलं आहे.View this post on Instagram
काही दिवसापूर्वी झी मराठीनं या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करत म्हटलं होतं की, नवा कार्यक्रम 'बँड बाजा वरात' (Band BajaVarat New Prmo) लवकरच.... #BandBajaVarat #ZeeMarathi. या शोची कनेस्पट नेमकी काय असणार याबद्दल कोणतीच माहिती मिळालेली नव्हती. परंतु प्रोमोतील कलश पाहून ही मालिका लग्नाशीसंबंधीत असल्याचे स्पष्ट झालं आहे. या प्रोमोमध्ये म्हटलं आहे की, झी मराठीकडून सप्रेम 'बँड बाजा वरात' झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. शिवाय मालिकेचे नाव देखील 'बँड बाजा वरात' असं आहे. त्यामुळे झी मराठीचा हा नवा प्रयोग पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. शिवया शोच्या तगड्या होस्टमुळे शो पाहण्यात मजा येणार हे नक्की आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial