मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रियाच्या 'रिअल लाईफ हिरो'चा कोरोनाने घेतला बळी, अभिनेत्रीवर पुन्हा कोसळला दु:खाचा डोंगर

रियाच्या 'रिअल लाईफ हिरो'चा कोरोनाने घेतला बळी, अभिनेत्रीवर पुन्हा कोसळला दु:खाचा डोंगर

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या(Ria Chakrborty) काकांचं कोरोनाने निधन झालं आहे. त्यामुळे बॉलीवूडला पुन्हा एक धक्का बसला आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या(Ria Chakrborty) काकांचं कोरोनाने निधन झालं आहे. त्यामुळे बॉलीवूडला पुन्हा एक धक्का बसला आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या(Ria Chakrborty) काकांचं कोरोनाने निधन झालं आहे. त्यामुळे बॉलीवूडला पुन्हा एक धक्का बसला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 7 मे : कोरोनाने (Coronavirus) अक्षरशः थैमान घातलं आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार प्रत्येकाला कोरोनाचा फटका बसत आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे मृतांचा. कोरोनामुळे अनेक बॉलीवूड कलाकरांनी जीव गमावला(Bollywood Actors Death) आहे. तर कित्येक कलाकारांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. नुकताच अभिनेता जैन इमाम(Zain Imam), निक्की तांबोळी(Nikki Tamboli) आणि पिया बाजपेई (Pia Bajpei) यांनी आपल्या भावांना गमावलं आहे. तर आत्ता अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या(Ria Chakrborty) काकांचं कोरोनाने निधन झालं आहे. त्यामुळे बॉलीवूडला पुन्हा एक धक्का बसला आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. आपल्या काकांचा फोटो शेयर करत, रियाने एक भावुक पोस्टही लिहिली आहे. पोस्टमध्ये रियाने आपल्या काकांना रियल लाईफ हिरो असं संबोधल आहे. रियाने सांगितलं ही काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आणि यातच त्यांचं निधन झालं आहे.

(हे वाचा:या अभिनेत्रीला प्रेमविवाह करणं पडलं महागात; काही वर्षांतच झाला घटस्फोट  )

रियाने फोटो शेयर करत म्हटलं आहे, ‘रिटायर्ड कर्नल एस.सुरेश कुमार वीएसएम, एक नामांकित अर्थोपेडीक सुद्धा होते. आणि एक खुपचं मायाळू वडील सुद्धा होते. तसेच एक सन्मानित अधिकारी होते. मात्र कोरोनाने त्यांना आमच्याकडून हिरावून घेतलं आहे. मात्र तुमचं कर्तुत्व सदैव आमच्या सोबत असेल. तुम्ही खऱ्या अर्थाने एक रियल लाईफ हिरो होता. अशा शब्दांत रियाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच रियाने चाहत्यांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे. कारण सुरक्षित राहण्याचा हाच एक मार्ग असल्याचं तिनं म्हटल आहे.

(हे वाचा:देशात हे काय चाललंय?’; ऑक्सिजनच्या तुडवड्यावरुन सुनील शेट्टी संतापला  )

गेल्यावर्षी अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीवर अनेक बाबतीत संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे ती सोशल मीडियावर ती बरीच चर्चेत होती. त्यानंतर ती सोशल मीडियावर फारच कमी सक्रीय होती. क्वचितचं तिची एखादी पोस्ट पाहायला मिळते.

First published:

Tags: Bollywood actress, Coronavirus, Instagram post