मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘आईच्या उपचारासाठी भाईजाननं केली मदत’; राखी सावंतनं मानले सलमान खानचे आभार

‘आईच्या उपचारासाठी भाईजाननं केली मदत’; राखी सावंतनं मानले सलमान खानचे आभार

 नुकताच राखीने रुग्णालयातून एक व्हिडीओ(video) पोस्ट केला आहे. त्यात राखी आणि तिची आई अभिनेता सलमान खानचे (salman khan)आभार मानताना दिसत आहेत.

नुकताच राखीने रुग्णालयातून एक व्हिडीओ(video) पोस्ट केला आहे. त्यात राखी आणि तिची आई अभिनेता सलमान खानचे (salman khan)आभार मानताना दिसत आहेत.

नुकताच राखीने रुग्णालयातून एक व्हिडीओ(video) पोस्ट केला आहे. त्यात राखी आणि तिची आई अभिनेता सलमान खानचे (salman khan)आभार मानताना दिसत आहेत.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 19 एप्रिल- बॉलीवूडची ड्रामा क्वीन (bollywood drama queen) अशी ओळख असणाऱ्या राखी सावंतला (rakhi savant) बऱ्याच दिवसांपासून आपल्या आईची काळजी होती. राखीची आई कॅन्सरने त्रस्त(rakhi savant mother face to cancer) आहे. आईच्या इलाजासाठी पैसे जमवता यावे म्हणून राखीने बिग बॉस 14 (bigg boss 14) मध्ये सहभाग घेतला होता. मात्र आता राखीची चिंता नाहीशी होणार आहे. कारण लवकरच तिच्या आईवर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नुकताच राखीने रुग्णालयातून एक व्हिडीओ(video) पोस्ट केला आहे. त्यात राखी आणि तिची आई अभिनेता सलमान खानचे (salman khan)आभार मानताना दिसत आहेत. पाहूया काय आहे नेमका व्हिडीओ.

राखी सावंतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. एका व्हिडीओ मध्ये ती मास्क लाऊन आपल्या आईजवळ उभी आहे. आणि यात तिची आई बेडवर दिसत आहे. यामध्ये राखी म्हणत आहे. माझा आईवर लवकरच शस्त्रक्रिया होतं आहे. डॉक्टर संजय शर्मा माझा आईवर ही शस्त्रक्रिया करणार आहेत. तसेच ती आईला म्हणते तुला आता घाबरायची अजिबात गरज नाहीय. डॉक्टर तुझा कॅन्सर पूर्ण बरा करणार आहेत. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको.

त्यांनतर राखी आपल्या आईला विचारते सलमान खानबद्दल काय बोलशील? यावर आई म्हणते सलमानने आपली त्यावेळी मदत केलीय जेव्हा आपल्याला मदतीची सर्वात जास्त गरज होती. आणि सलमानला आशीर्वाद देते. तसेच सलमान खान, सोहेल खानसोबत संपूर्ण कुटुंबाचे आभारही व्यक्त करते. हा व्हिडीओ पोस्ट करत राखी सावंतने देवाचे आणि सलमान खानचे आभार व्यक्त केले आहेत.

(अवश्य पाहा: ‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा )

तसेच राखी सावंतने एक दुसरा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात राखीच्या आईला ऑपरेशन साठी घेऊन जात आहेत. आणि ती आपल्या आईची हिम्मत वाढवत आहे. तिला आधार देत आहे.

(अवश्य वाचा: कोण होत्या सुमित्रा भावे? महाराष्ट्रानं गमावली समाजसेवेसाठी धडपडणारी दिग्दर्शिका)

राखी सावंतला बिग बॉस 14 मध्ये मोठ्या प्रमाणात पसंत करण्यात आलं. मात्र राखी त्यावेळी अतिशय कठीण प्रसंगात होती. आपल्या आईच्या इलाजासाठी पैसे मिळावे म्हणून ती या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

First published:

Tags: Aai, Bollywood, Rakhi sawant, Salman khan, Woman