मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'म्हणून केलं टॉपलेस फोटोशूट', अभिनेत्री रायमा सेनचा मोठा खुलासा

'म्हणून केलं टॉपलेस फोटोशूट', अभिनेत्री रायमा सेनचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री(Bollywood Actress) रायमा सेनने(Raima Sen) नुकताच टॉपलेस फोटोशूट(Topless Photoshoot) केलं होतं.

बॉलिवूड अभिनेत्री(Bollywood Actress) रायमा सेनने(Raima Sen) नुकताच टॉपलेस फोटोशूट(Topless Photoshoot) केलं होतं.

बॉलिवूड अभिनेत्री(Bollywood Actress) रायमा सेनने(Raima Sen) नुकताच टॉपलेस फोटोशूट(Topless Photoshoot) केलं होतं.

  मुंबई, 2 जून- बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress)  रायमा सेनने (Raima Sen) नुकताच टॉपलेस फोटोशूट (Topless Photoshoot) केलं होतं. आणि हे फोटो सोशल मीडियावर येताच बरीच चर्चा झाली होती. काहींनी तिला जोरदार ट्रोलसुद्धा केल होत. तर युजर्सनी कमेंट करत अनेक प्रश्न देखील उपस्थित केले होते. आत्ता याला रायमाने जोरदार उत्तर दिलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Raima Sen (@raimasen)

  रायमाने म्हटलं आहे, की या फोटोंना पोस्ट करून ती आपली इमेज किंवा त्यांनतर येणाऱ्या अडचणीचा विचार करत नाही. तसेच तिनं म्हटलं आहे. फक्त असे बोल्ड फोटो पोस्ट केल्यामुळे, त्याचा परिणाम माझ्या चित्रपटांच्या भूमिकेवर होईल असं अजिबात नाही. मला आजही माझ्यासाठी योग्य असणाऱ्या भूमिका मिळतात. आणि मी यात आनंदी आहे. मी आधीच माझं स्थान पक्क केलं आहे. त्यामुळे मला याची काहीच चिंता नाहीय. (हे वाचा:टीना दत्ताने केला टॉपलेस फोटोशूट, संस्कारी सुनेचा बोल्ड अंदाज पाहून चाहते अवाक्  ) तसेच फोटोंबद्दल बोलताना रायमा म्हणते,’सध्या आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. आणि अशा वेळेमध्ये आपल्याकडे करण्यासाठी खास असं काहीच नाहीय. आणि त्यामुळे मी हा फोटोशूट करायचा निर्णय घेतला होता. कारण मला स्वतःला नवीन गोष्टींसाठी तयार करायचं होतं. आणि काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं. म्हणून मी हे करून पाहिलं. (हे वाचा: इरफान खानने टिपले होते बाबिलचे काही खास क्षण, पाहा PHOTO ) मात्र याचा अर्थ असं नाहीय की मला या फोटोशूट नंतर बोल्ड आणि हॉटचं भूमिकांच्या ऑफर येतील. किंवा माझ्या वाट्याला तेच काम येईल. उद्या मी तुम्हाला भारतीय कपड्यामध्ये फोटोशूट करतानाही दिसू शकते. त्यामुळे यात फार वेगळ असं काहीच नाहीय. सध्या रायमा सेन एका वेबसिरीजमध्ये काम करत आहे. ‘द लास्ट आवर’ असं त्याचं नाव आहे. यामध्ये अभिनेता संजय कपूरसुद्धा झळकत आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bold photoshoot, Bollywood News, Entertainment, Social media, Social media troll

  पुढील बातम्या