राधिका मदानने शेअर केला Bikini Photo; मालदीव नव्हे तर सिक्रेट ठिकाणी घेतेय सुट्टीचा आनंद

राधिका मदानने शेअर केला Bikini Photo; मालदीव नव्हे तर सिक्रेट ठिकाणी घेतेय सुट्टीचा आनंद

राधिका मदानसुद्धा (radhika madan) सुट्टीचा आनंद लुटत आहे. आपले फोटो पोस्ट करत आहे. या फोटोंवरून ती इतर सेलिब्रिटींप्रमाणे मालदीवमध्येच आहे की काय असंच सर्वांना वाटत होतं.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल- बॉलिवूड (bollywood) असो किंवा छोटा पडदा हे सर्वच कलाकार सुट्टीचा (vacation) आनंद घेण्यासाठी मालदीवला (maldive) रवाना होत आहेत. मालदीवच्या किनाऱ्यावरील सुंदर फोटो हे लोक शेअर करत आहेत. नुकताच अभिनेत्री राधिका मदानचा (radhika madan) एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती स्विमिंगपूलमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहून सर्वांना वाटलं राधिकासुद्धा मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. पण राधिका मालदीवमध्ये नाही.

राधिका सध्या मुंबई पासून दूर कोरोनाच्या चिंतेपासून मुक्त होत सुट्टीचा आनंद घेत आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर ती आपले बिनधास्त फोटोसुद्धा पोस्ट करत आहे. तिचे फोटो पाहून तीसुद्धा मालदीवमध्ये आहे की काय, असंच सर्वांना वाटतं आहे. राधिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट (instagram post) केला आहे आणि आपण मालदीवमध्ये नसल्याचं तिनं सांगितलं आहे.

राधिकाने  स्विमिंग पूलमधील आपला फोटो पोस्ट करत तिने ‘not in maldives’ असं लिहिलं आहे. याचा अर्थ राधिका मालदीवमध्ये नाही तर एका सिक्रेट ठिकाणी सुट्टीचा आनंद घेत आहे. जे काही तिनं सांगितलं नाही. त्यामुळे राधिका नेमकी कुठे आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.

हे वाचा - नाकात नथ, कानात बुगडी आणि साडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज

काही दिवसांपूर्वी राधिकाने एयरपोर्टवरील खास व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात ती खूपच उत्साहित दिसून येत होती. राधिका चालता चालता अचानक डान्सच्या मूडमध्ये येते आणि एयरपोर्ट वरच मायकल जॅक्सनचा प्रसिद्ध ‘मून वॉक’(डान्सचा एक प्रकार) चालू करते. राधिकाने अभिनेत्रीसोबतच एक उत्तम डान्सर असल्याचं यातून दाखवून दिलं आहे. राधिकाच्या या व्हिडीओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणत पसंत केलं होतं. आणि तिच्या डान्सचं कौतुक देखील केलं होतं.

राधिकाने आपल्या अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली आहे. राधिकानं एकता कपूरची मालिका ‘मेरी आशिकी तुमसे ही’ मधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यात तिनं ‘ईशानी’ हे पात्र साकारलं होतं. या मालिकेत अभिनेता शक्ती अरोडा सुद्धा मुख्य भूमिकेत होता.

हे वाचा - प्रियांका चोप्राला होतं दारुचं व्यसन; कॉकटेल पिऊन विमानात झाली होती टल्ली )

सध्या ती बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवत आहे. राधिकाने विशाल भारद्वाजच्या ‘पटाखा’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तसेच तिनं मर्द को दर्द नही होता. आणि दिवंगत अभिनेता इरफान खानसोबत ‘अंग्रेजी मिडीयम’ मध्येसुद्धा मुख्य भूमिका साकारली आहे. अगदी कमी वेळेत बॉलिवूडमध्ये तिनं आपली खास ओळख निर्माण केली आहे.

Published by: Aiman Desai
First published: April 17, 2021, 2:47 PM IST

ताज्या बातम्या