• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • पती निकसोबतच्या हॉट PHOTO मुळे प्रियांका चोप्रावर भडकले युजर्स

पती निकसोबतच्या हॉट PHOTO मुळे प्रियांका चोप्रावर भडकले युजर्स

नुकताच प्रियांकाने पती निक जोनससोबत एक हॉट फोटो(Hot Photo) शेयर केला आहे. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 30 ऑगस्ट-  बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) अगदी साता समुद्रापार आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवला आहे. प्रियांका आज एक ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. प्रियांका सध्या आपल्या पतीसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. नुकताच प्रियांकाने पती निक जोनससोबत एक हॉट फोटो(Hot Photo) शेयर केला आहे. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
  बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. प्रियांकाने अनेक दमदार भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. तसेच प्रियांकाने हॉलिवूडमध्ये एन्ट्री करत स्वतःला ग्लोबल स्टार म्हणून ओळख निर्माण केली आहे. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रीय असते. ती सतत आपले हॉट फोटो आणि व्हिडीओ शेयर करून चाहत्यांना आपल्या अपडेट देत असते. चाहतेही तिच्या पोस्टला भरभरून दाद देत असतात.
  काही वेळेपूर्वी प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये ती खुपचं हॉट आणि बोल्ड लुकमध्ये दिसत आहे. प्रियांकाने यामध्ये बिकिनी परिधान केली आहे. तसेच यातील एका फोटोमध्ये पती निकसुद्धा तिच्यासोबत आहे. एका फोटोमध्ये प्रियांका सनबाथ घेताना दिसून येत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये प्रियांका बिचवर विसावली आहे. आणि तिच्या मागे पती निक जोनस काटा चमचे घेऊन मजेशीर पोझ देत आहे. (हे वाचा:दीपिका पादुकोण साकारणार द्रौपदी? 'या' चित्रपटाची होतेय निर्मिती ) मात्र यातील निकसोबतच्या फोटोसोबत प्रियांका ट्रोल होऊ लागली आहे. युजर्सच्या मते हा फोटो अत्यंत विचित्र आणि ऑड आहे. काही युजर्सनी कमेंट्स करत प्रियांकाला चांगलंचं झापलं आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे, ‘भारताची संस्कृती विसरलीस का? लाजसुद्धा विसरलीस’ तर आणखी एका युजर्सने कमेंट् करत म्हटलं आहे, ‘हे आम्ही काय पाहात आहोत?’ तर दुसऱ्या एकाने ‘ऑड’ असं म्हटलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: