प्रियांका चोप्रानं दिली 'गुड न्यूज', चाहतेही होतील खूश

प्रियांका चोप्रानं दिली 'गुड न्यूज', चाहतेही होतील खूश

काही दिवसांपूर्वी प्रियांकानं ती प्रेग्नन्ट असल्याचं वृत्त फेटाळलं असलं तरी तिनं नुकत्याच दिलेल्या या 'गुड न्यूज'मुळे तिचे चाहते नक्कीच खूश होतील.

  • Share this:

मुंबई, 14 एप्रिल : देसी गर्ल प्रियांका चोप्रानं बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये आपलं चांगलंच बस्तान बसवलं आहे. अमेरिकन गायक निक जोनस सोबत लग्न केल्यानंतर प्रियांका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. काही दिवसांपीर्वीच ती प्रेग्नन्ट असल्याची बातमी पसरली होती मात्र प्रियांकानं ती अफवा असल्याचं स्पष्ट केलं केलं मात्र तिनं नुकतीच एक गुड न्यूज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. 'बेवॉच' आणि 'इजन्ट इट रोमँटिक'नंतर प्रियांकाला आणखी एक हॉलिवूड सिनेमाची ऑफर मिळाली आहे आणि ही गोड बातमी तिनं इन्स्टाग्रामवरून तिच्या चाहत्यांशी शेअर केली.
 

View this post on Instagram
 

#PROUD @mindykaling @DanGoor


A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियांकाला मिळालेला हा सिनेमा एक वेडिंग कॉमेडी सिनेमा आहे. यूनिव्हर्सल पिक्चर्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या या सिनेमात प्रियांकासोबतच मिंडी केलिंग ही हॉलिवूड अभिनेत्रीही मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय मिंडी केलिंग आणि डॅन गोर या सिनेमाचा स्क्रिनप्ले लिहीणार आहेत. प्रियांकानं  एक स्क्रिनशॉट शेअर करत त्याखाली, 'सुंदर कथा सांगणाऱ्या दोन महिलांना त्यांची कथा त्यांच्याच अंदाजात सांगण्यासाठी हिरवा कंदिल मिळाला आहे. मिंडी केलिंग आणि डॅन गोरसोबत या पार्टनरशीपहद्दल मला अभिमान आहे. आम्ही तुम्हाला हे दाखवणार आहोत मॉडर्न, ग्लोबल आणि भारतीय असण्याचा अर्थ काय असतो.' असं सुंदर कॅप्शनही दिलं आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रियांका आणि निक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पसरल्या होत्या मात्र चोप्रा आणि जोनस कुटुंबियानी हे वृत्त फेटाळून लावलं. त्यानंतर प्रियांकानं शेअर केल्या या बातमीनं तिचे चाहते नक्कीच खूश होतील. प्रियांका चोप्राचा हा चौथा हॉलिवूड सिनेमा आहे. याआधी तिनं एबीसीची मालिका 'क्वांटिको' आणि 'अ किड लाइक जॅक', 'बेवॉच', 'इजंट इट रोमँटिक' या हॉलिवूड सिनेमात काम केलं आहे. याशिवाय तिच्याकडे बॉलिवूमधील 'द स्काय इज पिंक' आणि संजय लीला भन्साळींचा एक आगामी सिनेमा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 03:23 PM IST

ताज्या बातम्या