Home /News /entertainment /

ट्रान्सपरंट ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली प्रियांका चोप्रा; पाहताच हृतिक रोशनही स्वत:ला आवरू शकला नाही

ट्रान्सपरंट ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली प्रियांका चोप्रा; पाहताच हृतिक रोशनही स्वत:ला आवरू शकला नाही

बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूड गाजवणारी सौंदर्यवती अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आपल्या सौंदर्यानं नेहमीच सगळ्यांना वेड लावत असते.

मुंबई, 10 मार्च: बॉलिवूडच (Bollywood) नव्हे तर हॉलिवूड (Hollywood) गाजवणारी सौंदर्यवती अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आपल्या सौंदर्यानं नेहमीच सगळ्यांना वेड लावत असते. अत्यंत स्टायलिश ड्रेसमधील तिचे फोटो सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना घायाळ करत असतात. तिचा फॅशन सेन्स कमालीचा आहे. त्यामुळे तिच्या फोटोंना नेहमीच सर्वांची दाद मिळते. दरम्यान तिचा आता ब्लॅक ट्रान्सपरंट ड्रेसमधील एका फोटोनं सोशल मीडियावर आग लावली आहे. विशेष म्हणजे अभिनेता हृतिक रोशनही (Hrithik Roshan) त्यावर प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. जगभरातील नामांकित फॅशन डिझायनर्सनी बनवलेल्या ड्रेसमधील प्रियांकाचे फोटो व्हायरल होत असतात. नवनवीन फॅशन्सच्या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य नेहमीच खुलून दिसतं. पारंपरिक ड्रेसेसबरोबर पाश्चात्त्य स्टाईलचे ड्रेसेसही तिला खुलून दिसतात. प्रियांकानं नुकतंच एका मासिकासाठी फोटो शूट केलं आहे. या फोटोत तिनं एक काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस (Black Transparent Sheer Dress) परिधान केला असून, हाताच्या एका बोटावर बॉल फिरवताना दिसत आहे. या फोटोवर तिनं ‘क्या आप मेरे साथ खेलना चाहेंगे’ अशी कॅप्शन लिहिली आहे. हे वाचा - प्रसिद्ध अभिनेत्री Gauhar Khan ने प्रेग्नन्सीबाबत केला मोठा खुलासा तिच्या या ट्रान्सपरंट ब्लॅक ड्रेसमधील हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. तिच्या चाहत्यांना हा फोटो तर आवडलाच आहे. पण अभिनेता हृतिक रोशनही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं प्रियांकाच्या या फोटोवर, ‘हा हा बहुत अच्छा’ अशी कमेंट केली आहे, तर अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) यानं या फोटोवर फायर इमोजी टाकून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेक चाहत्यांनी ओ माय गॉड ! तसंच हार्टचे इमोजी टाकून प्रतिसाद दिला आहे. सोशल मीडियावर नेहमीच खळबळ माजवणाऱ्या प्रियांका चोप्रानं यावेळीही एका फोटोनं चाहत्यांना खूश केलं आहे. हे वाचा - अरे देवा! राखी सावंतचा ‘नागिन’ अवतार; VIDEO प्रचंड व्हायरल अमेरिकन संगीतकार, गायक निक जोनास याच्याशी लग्न झाल्यानंतर अमेरिकेत स्थायिक झालेली प्रियांका तिचे आणि निक जोनासचे (Nick Jonas) फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. बॉलिवूडपेक्षा सध्या ती हॉलिवूडमध्ये अधिक बिझी आहे. हॉलिवूड चित्रपटासह वेबसीरिजमध्ये ती काम करत आहे. अलिकडेच तिचं अनफिनिश्ड (Unfinished) नावाचं पुस्तक (Book) प्रकाशित झालं आहे. त्याबद्दलही तिचं कौतुक होत असून, त्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीजनी तिच्या पुस्तकाची प्रशंसा केली आहे.
First published:

Tags: Bollywood actress, Hritik Roshan, Priyanka chopra

पुढील बातम्या