Home /News /entertainment /

प्रियांकाची सासूसुद्धा कमी सुंदर नाही! अभिनेत्रीने फोटो शेअर करत काय लिहिलंय सासूबाईंबद्दल पाहा

प्रियांकाची सासूसुद्धा कमी सुंदर नाही! अभिनेत्रीने फोटो शेअर करत काय लिहिलंय सासूबाईंबद्दल पाहा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या एक आंतराष्ट्रीय स्टार बनली आहे. प्रियांका चोप्रा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड (Bollywood & Hollywood) असा पल्ला गाठलेली प्रियांका आपल्या कामात कितीही व्यग्र असली तरी ती आपल्या कुटुंबासाठी वेळ काढतेच.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 जुलै-  अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या एक आंतराष्ट्रीय स्टार बनली आहे. प्रियांका चोप्रा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड (Bollywood & Hollywood) असा पल्ला गाठलेली प्रियांका आपल्या कामात कितीही व्यग्र असली तरी ती आपल्या कुटुंबासाठी वेळ काढतेच.सासर असो किंवा माहेर प्रियांका कुटुंबातील सर्वच व्यक्तींच्या अगदी जवळ आहे. दरम्यान आज प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि निक जोनसची आई अर्थातच अभिनेत्रीची सासू, डेनिस मिलर जोनस यांचा वाढदिवस आहे.यानिमित्ताने अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. प्रियांका चोप्रा सध्या देशाबाहेर, बॉलिवूडपासून दूर असली तरी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना विविध अपडेट्स देत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहात असतात. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या दोन जवळच्या व्यक्तींचे फोट शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांका चोप्राने काही वेळेपूर्वी इन्स्टाग्रामवर आपला भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ स्विमिंगपूलमध्ये खेळताना दिसत आहे. प्रियांकाने इमोशनल पोस्ट लिहून भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहलंय, ''लव्ह यू सिड, मी नेहमी तुझ्यासाठी आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुझ्यासाठी खूप प्रेम''. (हे वाचा:IND Vs ENG: करीनाने पहिल्यांदाच तैमुरला नेलं स्टेडिअमवर; पाहा त्याची रिअ‍ॅक्शन ) त्यांनतर अभिनेत्रीने आणखी एक फोटो शेअर केला आहे. दुसऱ्या फोटोमध्ये प्रियांका निक जोनसची आई अर्थातच आपल्या सासूबाईंसोबत दिसून येत आहे. अभिनेत्रीने निखळ हास्य करतानाचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सासू आणि सुनेचं खास बॉन्डिंग या फोटोमध्ये दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे...तुम्ही माझ्या आयुष्यात आहात त्यामुळे मी स्वतःला धन्य समजते'. असं म्हणत प्रियांकाने सासूवर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Priyanka chopra

    पुढील बातम्या