मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रियांका चोप्राने हटवले नावसमोरचे पती निक जोनासचे आडनाव; घटस्फोटाच्या चर्चांना आई मधू चोप्रांनी दिलं उत्तर

प्रियांका चोप्राने हटवले नावसमोरचे पती निक जोनासचे आडनाव; घटस्फोटाच्या चर्चांना आई मधू चोप्रांनी दिलं उत्तर

चित्रपटांसोबतच प्रियांका चोप्रा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही (Priyanka Chopra Jonas) खूप चर्चेत असते. प्रियांका चोप्राने असे काही केले आहे ज्यामुळे तिच्या लग्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चित्रपटांसोबतच प्रियांका चोप्रा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही (Priyanka Chopra Jonas) खूप चर्चेत असते. प्रियांका चोप्राने असे काही केले आहे ज्यामुळे तिच्या लग्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चित्रपटांसोबतच प्रियांका चोप्रा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही (Priyanka Chopra Jonas) खूप चर्चेत असते. प्रियांका चोप्राने असे काही केले आहे ज्यामुळे तिच्या लग्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 22 नोव्हेंबर: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. देशातच नाही तर परदेशातही तिच्या चाहत्यांची कमतरता नाही. चित्रपटांसोबतच प्रियांका चोप्रा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही (Priyanka Chopra Jonas) खूप चर्चेत असते. प्रियांकाने अनेकदा सोशल मीडियावर पती निक जोनासवरील प्रेम व्यक्त केले आहे.प्रियांकाने अनेकदा सोशल मीडियावर पती निक जोनासवरील (Nick Jonas) प्रेम व्यक्त केले आहे. पण, आता या जोडप्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियांका चोप्राने असे काही केले आहे ज्यामुळे तिच्या लग्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रियांका चोप्राने 22 नोव्हेंबरला तिच्या इन्स्टा बायोमधून पती निक जोनासचे आडनाव हटवले आहे. प्रियांका चोप्राने केलेल्या या बदलामुळे तिच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. प्रियांका आणि निकच्या नात्यात कुठेतरी दुरावा तर नाही ना? अभिनेत्रीचे चाहते तिला सतत हाच प्रश्न विचारत आहेत.

वाचा : अजून कोरोना संपलेला नाही!' पॉझिटिव्ह आल्यानंतर या अभिनेत्यानं केलं Tweet

प्रियंका चोप्राने अचानक तिच्या नावासमोर निक जोनासचे नाव काढून टाकले आहे. यामुळे सोशल मीडियावरून असा अंदाज लावला जात आहे की, प्रियांका-निकच्या नात्यात काहीतरी बिनसले आहे. दोघेही घटस्फोट घेणार आहेत, असाही काहींचा समज आहे. पण, विशेष बाब म्हणजे प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टा बायोमधून केवळ तिच्या पती निक जोनासचे आडनावच नाही तर स्वतःचे आडनाव 'चोप्रा' देखील काढून टाकले आहे.

Priyanka Chopra, Nick Jonas, priyanka nick divorce, priyanka chopra divorce Rumours, प्रियंका चोपड़ा, निक जोनास, प्रियंका निक तलाक, priyanka chopra drops Jonas from Insta bio, priyanka chopra jonas, bollywood news, hollywood news

प्रियांकाने असे केल्याने तिचे आणि निक जोनासचे चाहते खूप नाराज झाले आहेत. ट्विट करताना अनेकजण त्यांना प्रश्न विचारत आहेत. दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे की नाही, असे प्रश्न विचारले जात आहेत. एका यूजरने ट्विट करत लिहिले आहे की, 'मला प्रियांका आणि निकमध्ये काहीतरी गडबड वाटत आहे. तो क्वीनलँडमध्ये असताना मी हे बोललो होतो. त्यांची पत्नी वगळता त्यांचे संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत होते.

प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा यांची प्रतिक्रिया

प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा अनेकदा अमेरिकेत तिची मुलगी आणि जावईसोबत वेळ घालवताना दिसते. ती निकला तिचा मुलगा मानते. अशा परिस्थितीत प्रियांकाच्या घटस्फोटाची बातमी येताच तिने त्यांनी यावर  प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या बातम्यांना बकवास म्हटले असून अफवा पसरवू नका असे आवाहन केले आहे. त्याच्या मते, दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे.

वाचा : रकुलप्रीत -जॅकी भगनानीशी कधी करणार लग्न? अभिनेत्रीने सांगितला संपूर्ण प्लॅन

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 मध्ये लग्न केले आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये मोठ्या थाटामाटात दोघांचं लग्न झालं. निक-प्रियांका यांनी आधी हिंदू आणि नंतर ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. ज्याची सर्वत्र चर्चा झाली. लग्नानंतरच प्रियांकाने सोशल मीडियावर तिच्या नावापुढे जोनास लावायला सुरुवात केली. पण, आता त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने या जोडप्याचे चाहते अस्वस्थ झाले आहेत.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Hollywood, Priyanka chopra