मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही; प्रियांका चोप्राने सांगितले वर्णभेदाचे अनुभव

मी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही; प्रियांका चोप्राने सांगितले वर्णभेदाचे अनुभव

Priyanka Chopra on Body shaming: शरीरावरून, रंगावरून प्रियांकाला अनेक वेळा अपमान सहन करावा लागला आहे. त्याबद्दल तिने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.

Priyanka Chopra on Body shaming: शरीरावरून, रंगावरून प्रियांकाला अनेक वेळा अपमान सहन करावा लागला आहे. त्याबद्दल तिने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.

Priyanka Chopra on Body shaming: शरीरावरून, रंगावरून प्रियांकाला अनेक वेळा अपमान सहन करावा लागला आहे. त्याबद्दल तिने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.

मुंबई, 14 मे: बॉलिवूडपाठोपाठ (Bollywood) हॉलिवूडमध्येही (Hollywood) आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिनं नुकतेच आपली शरीरयष्टी आणि त्यावरून तिला झेलावी लागलेली टीका टिपण्णी, तिचं झालेलं मूल्यमापन, तिचा आपल्या शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन इत्यादीबाबत आपले विचार व्यक्त केले. शरीरावरून, रंगावरून प्रियांकाला अनेक वेळा अपमान सहन करावा लागला आहे. त्यानंतरही ती खंबीरपणे उभी राहिली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलेब्रिटी म्हणून तिनं आपलं स्थान पक्कं केलं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या क्वांटिकोसारख्या सिरीयलसह अनेक चित्रपट,सिरीयल्स,शोजमध्ये तिनं आपला ठसा उमटवला. इतकंच नव्हे तर ऑस्करपर्यंतही झेप घेतली. बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीची ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. प्रियांकानं आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर हे यश मिळवलं आहे. आपल्या यशाचं हेच गमक असल्याचं तिनं ‘याहू लाइफ’शी बोलताना सांगितलं.

प्रियांका म्हणाली, ‘शरीरावरून(Body), रंगावरून मला जी वागणूक देण्यात आली, जे अनुभव आले त्याचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही असं नाही. इतरांप्रमाणे मी ही वयाने मोठी होईन तशी माझ्या शरीरावरही त्याच्या खाणाखुणा दिसणारच आहेत. ते मी मानसिक दृष्ट्या स्वीकारलं आहे. आताचं माझं शरीर बघून मी म्हणते मी आता जशी दिसते तसं मी मला स्वीकारलं आहे. मी दहा-वीस वर्षापूर्वी जशी दिसत होते तशी आता दिसणार नाही. हे मी मान्य करते, मनापासून स्वीकारते.’

‘हे खूप अवघड आहे पण मला वाटते यामुळं तुम्ही जशा आहात तशा जगासमोर येण्याची तुमची तयारी असल्यानं तुमचाआत्मविश्वास वाढतो. कधी कधी मलाही माझं शरीर आवडेनासे होते. त्या वेळी मी इतर गोष्टींबाबत आनंद मानण्याचा प्रयत्न करते. मला ज्यामुळे आनंद होईलअशा गोष्टी मी करते,’असंही प्रियांकानं सांगितलं.

पुरुषांनाही असतो या कामात Interest; समाजाने स्वीकारला बदल

‘माझ्यावर किती लोकांचं प्रेम आहे,याची मी स्वतःलाआठवण करूनदेते त्यामुळंमलामनापासून बरेवाटते. मी खोलीत फिरत असताना मी स्वतःलाच आठवण करून देते की, मला माझ्या शरीराशी काहीही देणं घेणं नाही. यामुळे माझा आत्मविश्वास वाढतो. याचं श्रेय आपल्या संस्कृतीलाही आहे’,असंही प्रियांकानं सांगितलं.

पाहा साऊथची मलायका; हिना पांचाळच्या अदा पाहून तुम्ही देखील व्हाल घायाळ

‘कुटुंबासमवेत वेळ घालवण्याचं महत्त्व आणि त्यामुळं मिळणारा आनंद, आधार याबद्दल प्रियांकानं सांगितलं. प्रियांका सगळ्या व्यापातून व्यायामासाठी तसंच इतर गोष्टींसाठीही वेळ काढते.मला जेंव्हा संगीत ऐकायचे असते तेव्हा मी ते ऐकते, तो वेळ माझा असतो, असंही तिनं सांगितलं. ‘सध्या मी एका अॅक्शन शोचं शूटिंग करत आहे, तेव्हा मी दर आठवड्याला संगीत ऐकत, फुगे सोडून बाथटबमध्ये मस्त अंघोळ करते. मी माझ्या विचारात रमून गेलेली असते. स्वत:साठी वेळ दिला पाहिजे. स्वतःला प्राधान्य दिलं पाहिजे. सध्याच्या काळात नुसतं धावण्यापेक्षा थोडं स्वतःकडे बघितलं पाहिजे. मग तुम्ही जगाशीही लढू शकता.’ असं सांगत प्रियांकानं आत्मविश्वासानं जगण्याचा जणू मूलमंत्रच दिला आहे.

‘बिकिनी घालणार नाही…’; दिव्यांकानं बिचवर केलं साडीमध्ये Photo shoot

प्रियांका लवकरच ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि ‘मॅट्रिक्स4’मध्ये दिसणार आहे.

First published: