मुंबई, 17 जुलै : कोरोना लॉकडाऊनमध्ये (corona lockdown) वीज बिलाने (light bill) अनेकांना धक्का दिला आहे. भरमसाठ विजेचं बिल हातात पडताच शॉक बसला. फक्त सर्वसामान्यच नव्हे तर सेलिब्रिटींनाही विजेच्या बिलाचा झटका बसला. अभिनेत्र तापसी पन्नूनंतर, वीरदास आणि आता पूजा बेदी (Pooja Bedi) आपलं वीज बिल पाहून हैराण झाली.
पूजाला सुरुवातीचं वीज बिल कमी आलं, त्यामुळे तिला खूप आनंद झाला होता. तिनं आपण ज्या कंपनीची वीज वापरतो त्या कंपनीचं कौतुकही केलं. इतकंच नव्हे तर वीज बचत कशी करावी याचा सल्लाही तिनं दिला.
Actually my electricity bill dropped lower... im with @TataPower .. they are FAB!!!!
Also.. highly.recommend LED bulbs... they save SO much electricity cost
पूजाने आधी ट्वीट केलं, "माझं वीज बिल खूप कमी झालं आहे. माझं विजेचं बिल टाटा पॉवरकडून येतं आणि ते खरंच कमालीचे आहेत. आणखी एक म्हणजे एलईडी बल्बचा वापर करण्याचा सल्ला मी देते, यामुळे विजेची खूप बचत होते."
यानंतर नवं बिल पूजाच्या हातात पडलं आणि ते पाहून ती शॉक झाली. इतकं वीज बिल कसं आलं याबाबत तिनं आश्चर्य व्यक्त केलं.
I spoke too soon😂😪😪😪😪😪 my power bill from 8000 has risen to 32250 this month despite me not being in Mumbai.
पूजाने ट्वीट केलं, "मी माझं मत मांडण्यात घाई केली. या महिन्यात मी मुंबईत नाही तरी माझं 8 हजारचं बिल वाढून 32 हजार 250 रुपये झालं. मला विश्वासच बसत नाही आहे"
मुंबईतील सर्वसामान्यांपासून बॉलिवूड कलाकारांचेही मोठ्या आकड्यांचे बिल पाहून डोळे मोठे झाले आहे. बर्याच कलाकारांना वाढीव वीज बिलाबाबत सोशल मीडियावर तक्रार केली. अभिनेत्री तापसी पन्नूनंतर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही सोशल मीडियावर वीज बिलाबद्दल तक्रार केली. चित्रपट अभिनेत्री रेणुका शहाणे, तापसी पन्नू यांच्यानंतर तुषार गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा विषय उपस्थित केला. बॉलिवूड कलाकारांच्या तक्रारीवर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बिलात कोणतीही फसवणूक झालेली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बिल हप्त्यात भरा, असं नितीन राऊत म्हणाले होते.