Home /News /entertainment /

सेटवरचं कोसळली नुसरत भरूचा; शुटींगदरम्यान अभिनेत्रीला अटॅक

सेटवरचं कोसळली नुसरत भरूचा; शुटींगदरम्यान अभिनेत्रीला अटॅक

‘सोनू के टिटू की स्विटी’ चित्रपटामुळे प्रसिद्धीत आलेली अभिनेत्री म्हणजे नुसरत भरुचा होय

  मुंबई, 7 ऑगस्ट- कोरोनाची (Corona Pandemic) स्थिती हळूहळू सुधारू लागल्याने पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत होतं आहे. कोरोना नियमांचं पालन करून सर्व उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच चित्रपटाच्या शुटींगलासुद्धा सुरुवात झाली आहे. अनेक कलाकार सध्या शुटींगमध्ये(Shooting) व्यग्र आहेत. अभिनेत्री नुसरत भरुचासुद्धा (Nusharat Bharuccha) आपल्या लव रंजन यांच्या एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. मात्र नुसरतची तब्बेत अचानक बिघडली आहे ती सेटवरचं कोसळली त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरच्या मते नुसरतला व्हर्टीगोचा अटॅक आला होता.
  ‘सोनू के टिटू की स्विटी’ चित्रपटामुळे प्रसिद्धीत आलेली अभिनेत्री म्हणजे नुसरत भरुचा होय. नुसरतने अगदी कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपलं एक खास स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावरसुद्धा ती खुपचं लोकप्रिय आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, नुसरत सध्या आपल्या आपल्या एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये बिझी आहे. ती सध्या दिग्दर्शक लव रंजनच्या चित्रपटात काम करत आहे. गेली 20 ते 25 दिवस झालं या चित्रपटाचं शुटींग सुरु आहे. (हे वाचा: Raj Kundra Case: तब्बल 8 तास सुरु होती शर्लिन चोप्राची चौकशी, केले अनेक खुलासे) नुसरत अगदी उत्तम आपलं शुटींग पूर्ण करत होती. मात्र गेली काही दिवस तिची तब्बेत काहीशी बिघडली होती. तिला सेटवरचं अस्वस्थ वाटू लागलं होतं. मात्र अशाही स्थितीत ती आपलं शुटींग करतचं होती. आणि अशातच अचानक ती सेटवर कोसळली. नुसरतला शुटींगदरम्यानचं चक्कर आली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. तिला खुपचं अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे तिला उठता-बसता येणं कठीण होतं आहे. मात्र सध्या तिची तब्बेत स्थिर आहे. नुसरत आत्ता अगदी बरी आहे. मात्र तिला बेडरेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डॉक्टरांच्या मते तिला व्हर्टीगोचा अटॅक आला होता. (हे वाचा:EXCLUSIVE: .... म्हणून 17 वर्षांनी श्रेयस तळपदे अचानक वळला मराठी मालिकेकडे!) सध्या चित्रपटाचं शुटींग थांबवण्यात आलं आहे. कारण प्रत्येक सीनमध्ये नुसरतची भूमिका आहे. त्यामुळे तिच्याशिवाय शुटींग करणं कठीण आहे. यासंदर्भात नुसरतशीदेखील संपर्क साधण्यात आला आहे. नुसरतनेसुद्धा या गोष्टींचा खुलासा केला आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment

  पुढील बातम्या