मुंबई, 15 जून- नोरा फतेहीची ओळख एक उत्कृष्ट डान्सर म्हणून जास्त आहे. बाहुबली सिनेमामुळे चर्चेत आलेली नोरा आपल्या डान्स व्हिडिओमुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकताच तिचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात नोरा कपडे विकताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नोरा बँकॉकमधील एका लोकल मार्केटच्या जमिनीवर बसून कपडे विकत असल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या आजूबाजूला कपड्यांचे ढिगही दिसत आहे. तिने एक पॅन्ट हातात घेऊन सातशे, आठशे दोनशेमध्ये कपडे घ्या असं बोलताना दिसत आहे.
हेही वाचा- तैमुरला सोडा, लिसा रेच्या एक वर्षाच्या जुळ्या मुलींचे फोटो पाहिलेत का?
विशेष म्हणजे ती अगदी आनंदात कपडे विकताना दिसत आहेत. हे कमी की काय ती ग्राहकासोबत भावही करत आहे. पण नोरा खरंच बँकॉकच्या बाजारात कपडे विकत नसून ती फक्त मित्र- मैत्रिणींसोबत मस्ती करत असल्याचं म्हटलं. नोराचं हे वेगळं रूप पाहून तिचे काही चाहते हैराण झाले तर काहींना हा व्हिडिओ आवडलाही. नुकतीच नोरा सलमान खानच्या भारत सिनेमात दिसली होती. त्याआधी ती ‘दिलबर दिलबर’ गाण्यामुळे चर्चेत आली होती. हे गाणं एवढं प्रसिद्ध झालं होतं की आतापर्यंत १२ कोटींहून जास्त व्ह्यूज या गाण्याला मिळाले होते.
हेही वाचा- ‘तुझ्यात जीव रंगला’मधील राणादाच्या वडिलांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल
नोरा ही एक कॅनेडियन डान्सर आणि मॉडेल आहे. तिने हिंदी सिनेमांशिवाय अनेक तेलगु आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय बाहुबली- द बिगिनिंग, किक- २, आणि स्त्री सिनेमांत तिने आयटम साँग केले होते. याशिवाय लवकरच ती स्ट्रीट डान्सर ३डी सिनेमात ती दिसणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा- ‘या’ अभिनेत्यालाच लग्नाची मागणी घालत अश्लील मेसेज पाठवतात मुलं
World Cup: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर पावसाचं ग्रहण