मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

नीतू कपूर-ऋषि कपूर यांच्या आठवणीत भावुक; थ्रोबॅक फोटो शेअर करत केलं मनमोकळं

नीतू कपूर-ऋषि कपूर यांच्या आठवणीत भावुक; थ्रोबॅक फोटो शेअर करत केलं मनमोकळं

नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि ऋषी कपूर (Rishi Kapoor) ही जोडी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर जोडी मानली जाते. नीतू जितक्या सुंदर तितकेच देखणे ऋषी देखील होते. त्यामुळे चाहते त्यांची जोडी आयकॉनिक मानतात.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 30 नोव्हेंबर- नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि ऋषी कपूर (Rishi Kapoor) ही जोडी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर जोडी मानली जाते. नीतू जितक्या सुंदर तितकेच देखणे ऋषी देखील होते. त्यामुळे चाहते त्यांची जोडी आयकॉनिक मानतात. वयाच्या 63व्या वर्षीही नीतू खूपच फिट आणि सुंदर दिसतात.तशा तर नीतू खूप बिझी असतात. त्या लवकरच अनिल कपूरसोबत 'जुग जुग जिओ' या चित्रपटात दिसणार आहेत. पण त्यांना ऋषी कपूर यांची आठवण सारखी सतावत असते. नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांसोबत मुलगी रिद्धिमा कपूरही प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही.

नीतू कपूरने यांनी इन्स्टावर एक थ्रोबॅक फोटो शेअर करून दिवंगत पती ऋषी कपूर यांची आठवणींना उजाळा दिला आहे. अतिशय सुंदर पद्धतीने काढलेल्या या फोटोत नीतू ऋषी कपूर यांच्यासोबत मोटारसायकलवर समोर बसलेल्या दिसत आहेत. नीतू यांनी बीज कलरचा शर्ट आणि ब्रिक कलरची पँट परिधान केली आहे. या फोटोत त्या खूप क्यूट दिसत आहेत. तर ऋषी यांनी निळ्या रंगाचा टी-शर्ट, बेलबॉटम पॅन्ट आणि स्नीकर घातली आहे. यामध्ये ते अतिशय देखणे दिसत आहेत.

वाचा : धर्मेंद्र यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या टीमसोबत शेअर केला PHOTO; युजर्स म्हणाले 'रणवीर पेक्षा यंग'

या फोटोवर नीतू कपूर-ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूरने हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. तर साजिद नाडियादवाला यांच्या पत्नीने 'अॅडरोबल नीतू जी' असे लिहिले आहे. त्याचवेळी, हा फोटो पाहून अभिनेत्री नीलम कोठारी यांनी देखील 'किती गोड' अशी कमेंट केली आहे. याशिवाय एकता कपूर, सिकंदर खेर यांनीही प्रेम व्यक्त केले आहे. त्याचवेळी चाहतेही या रोमँटिक जोडप्याचे आयकॉनिक म्हणून वर्णन करत कमेंट करत आहेत.

नीतू कपूर अनेकदा ऋषी कपूर यांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. ऋषी यांच्या मृत्यूनंतर नीतू पहिल्यांदा रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती तेव्हा त्या त्यांच्या आठवणीत रडू कोसळले. शोची थीम ऋषी यांच्यावर ठेवण्यात आली होती आणि नीतूला पाहुण्या जज म्हणून बोलावण्यात आले होते.याशिवाय ऋषींच्या 69 व्या जयंतीनिमित्त नीतूने एक जुना फोटो शेअर करत सोशल मीडियावर लिहिले की, 'न्यूयॉर्कमध्ये घालवलेल्या अत्यंत क्लेशदायक क्षणांमध्ये मी ऋषीजींकडून खूप काही शिकलो. आजारपणातही खात, हसत, खरेदी करत राहिलो.

वाचा : 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला वॉरंट जारी; कोर्टाने दिले हजर राहण्याचे आदेश

30 एप्रिल 2020 रोजी कर्करोगासारख्या वेदनादायक आजाराशी लढताना ऋषी जीवनाची लढाई हरले. त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू होते.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment