मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: 'सून कशी आहे?' लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच पाहा काय म्हणाल्या नीतू कपूर

VIDEO: 'सून कशी आहे?' लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच पाहा काय म्हणाल्या नीतू कपूर

बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री आलिया भट्ट  (Alia Bhatt)  नुकतंच रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor)  लग्नबंधनात  (Wedding) अडकली आहे.आता ती बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपूर कुटुंबाची सून बनली आहे. त्यामुळे सध्या ती प्रचंड चर्चेत आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 28 एप्रिल-  बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री आलिया भट्ट  (Alia Bhatt)  नुकतंच रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor)  लग्नबंधनात  (Wedding) अडकली आहे.आता ती बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपूर कुटुंबाची सून बनली आहे. त्यामुळे सध्या ती प्रचंड चर्चेत आहे. सतत सोशल मीडियावर आलियाबाबत काही ना काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. दरम्यान आता सून कशी आहे? याचा खुलासा तिच्या सासूबाईंनी केला आहे. पाहूया नीतू कपूर (Neetu Kapoor)  नेमकं काय म्हणाल्या.

नुकतंच प्रसिद्ध पापाराझी विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांचा आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आता नीतू कपूर यांची सून बनली आहे. रणबीर कपूर हा नीतू आणि ऋषी यांचा लाडका मुलगा आहे. त्यामुळे या सासू-सुनेचं नातं कसं आहे? आणि आलिया भट्ट एक सून म्हणून कशी आहे? हे जाणून घ्यायला प्रत्येकजण उत्सुक आहे. त्यामुळेच पापाराझींनी नीतू कपूर यांना पाहताच सर्वांच्या मनातला प्रश्न विचारून टाकला.

नीतू कपूर सध्या एका रिऍलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसून येत आहेत. त्यामुळे पापाराझी सतत त्यांना त्यांच्या सेटवर जाऊन गाठतात. आजही असंच काहीसं झालं. नीतू कपूर दिसताच पापाराझी त्यांच्याजवळ गेले. आणि त्यांनी उत्सुकतेने विचारलं 'सून कशी आहे तुमची?' वास्तविक पापाराझी आलियाबद्दल औपचारिक विचारपूस करत होते. त्यामुळेच नीतू कपूर यांनी सांगितलं, 'सून उत्तम... अगदी उत्तम..' यावेळी नीतू यांच्या उत्तरापेक्षा त्यांच्या हावभावाने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. यावेळी त्या फारच उत्साहात दिसत होत्या.

14एप्रिलला आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. लग्नानंतर आलिया ते नीतू कपूर यांनी अनेक सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अजूनही सोशल मीडियावर या फोटो आणि व्हिडीओची चर्चा होत असते, सोबतच नीतू कपूर आणि आलिया भट्ट यांच्या सुंदर बॉन्डिंगचीसुद्धा चर्चा होते. या दोघींमध्ये फारच छान नातं असल्याचं अनेकवेळा दिसून आलं आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor