Home /News /entertainment /

दिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा

दिग्दर्शकाच्या मागणीवर घालावी लागली होती 'पॅडेड ब्रा'; नीना गुप्तांचा खुलासा

नीना गुप्तांनी आपल्या ऑटोबायोग्राफी 'सच कहूं तो (Sach Kahun Toh)'मध्ये हा खुलासा केला आहे.

मुंबई, 17 जून-  बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. त्याचं कारण आहे त्यांची ऑटोबायोग्राफी 'सच कहूं तो (Sach Kahun Toh)'. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांची ऑटोबायोग्राफी लाँच केली आहे. या पुस्तकात त्यांनी लग्नापूर्वी गर्भवती होणं, संघर्षांनी भरलेलं सिंगल पॅरेंटहूड (single parenthood) आणि बॉलिवूडमध्ये यशस्वी पुनरागमनाबाबत भाष्य केलंय. या पुस्तकात त्यांनी एका डायरेक्टरच्या डिमांडवर त्यांना पहिल्यांदा पॅडेड ब्रा (padded bra) घालावी लागली होती, याबाबत एक खुलासा केलाय. हा किस्सा 1993मध्ये आलेल्या खलनायक चित्रपटातील आहे.
View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी त्यांची ऑटोबायोग्राफी 'सच कहूं तो (SachKahunToh)' मध्ये हा किस्सा सांगितला आहे. त्यांनी लिहिलंय,की सुभाष घई (Subhash Ghai) यांच्या खलनायक (Khal Nayak) चित्रपटातील गाण्याच्या शुटिंगवेळी डायरेक्टरने पॅडेड ब्रा घालण्याची मागणी केली होती. ‘मी जेव्हा पहिल्यांदा ते गाणं ऐकलं तेव्हा मला वाटलं की ते खूप छान होईल. त्यानंतर सुभाष घई यांनी मला माझी भूमिका सांगितल्यानंतर मी अजून एक्सायटेड झाले. माझं हे गाणं माझी मैत्रिण इला अरुणने गायलं होतं, याचाही मला आनंद होता. तिच्यासोबत मी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.’ (हे वाचा:अहाना कुमराचा BIKINI लुक VIRAL; स्विमिंगचा आनंद लुटतेय अभिनेत्री  ) तेव्हाच्या आठवणी सांगताना त्यांनी लिहिलंय,‘मला त्या गाण्यासाठी गुजराती पोशाख देण्यात आला आणि फायनल लूक दाखवण्यासाठी सुभाष घई यांच्याकडे पाठवलं. मला बघून सुभाष घई नाही, नाही काहीतरी भरा असं ओरडले. त्यामुळे मला प्रचंड लाज वाटली. मला माहिती होतं की ते गाण्यासाठी असं म्हणत होते, त्यात पर्सनल काही नव्हतं तरीही मी त्या दिवशी शूटिंग केलं नाही. दुसऱ्या दिवशी मला ब्लाऊजच्या आत घालण्यासाठी पॅडेड ब्रा दिली. त्यानंतर माझा लूक पुन्हा सुभाषजींना दाखवण्यात आला त्यावेळी ते लूक पाहून समाधानी दिसत होते.’ (हे वाचा: धक्कादायक! पोस्ट शेयर करत अभिनेत्रीने 14 लोकांवर केला लैंगिक शोषणाचा आरोप  ) नीना गुप्ता यांनी त्यांच्या या पुस्तकात आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यापैकी एकात त्या लिहितात, जेव्हा त्या क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स आणि त्यांची मुलगी 'मसाबा'ला जन्म देणार होत्या त्या आधी अॅक्टर-डायरेक्टर सतीश कौशिक यांनी त्यांना लग्नासाठी मागणी घातली होती. नीना गर्भवती होत्या तरीही त्यांना होणाऱ्या बाळासह स्वीकारण्यास सतीश कौशिक तयार होते, असं नीना गुप्तांनी लिहिलंय.
Published by:Aiman Desai
First published:

Tags: Bollywood actress

पुढील बातम्या