मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'खूप राग आला...', एअरपोर्ट स्टाफवर भडकल्या नीना गुप्ता, शेअर केला VIDEO

'खूप राग आला...', एअरपोर्ट स्टाफवर भडकल्या नीना गुप्ता, शेअर केला VIDEO

नीना गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यावर त्यांचे अनेक चाहते आणि बॉलिवूडमधील कलाकार कमेंट्स करत आहेत. या व्हिडीओमध्ये नीना गुप्ता विमानतळावरील कर्मचाऱ्यांवर चिडताना (Neena Gupta got angry on airport staff) दिसत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 10 ऑक्टोबर: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या (Neena Gupta Latest News) उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जातात. एखादा सिनेमा निवडण्याबाबतही अनेकदा त्यांचं कौतुक केलं जात. शिवाय नीना गुप्ता सोशल मीडियावर खासकरून इन्स्टाग्रावर (Neena Gupta Instagram) विशेष सक्रीय आहेत. सोशल मीडियावर त्या केवळ त्यांच्या फॅशन सेन्सने लोकांना प्रभावित करत नाही, तर सामान्य जीवनातील समस्याही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नीना गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडीओ (Neena Gupta latest Video on Instagram) पोस्ट केला आहे, ज्यावर त्यांचे अनेक चाहते आणि बॉलिवूडमधील कलाकार कमेंट्स करत आहेत. या व्हिडीओमध्ये नीना गुप्ता विमानतळावरील कर्मचाऱ्यांवर चिडताना (Neena Gupta got angry on airport staff) दिसत आहेत.

नीना यांना एअरपोर्टवर विचित्र अनुभव आला आणि तो त्यांनी 'खरं सांगायचं तर (Sach kahun toh) असं कॅप्शन देत शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि एअरपोर्ट स्टाफवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी या व्हिडीओत असे म्हटले आहे की, 'आज मला विमानतळावर खूप वाईट अनुभव आला. तुमच्याकडे ऑनलाईन बोर्डिंग पास असला तरी त्याची हार्ड कॉपी तुमच्याजवळ ठेवा. माझ्याकडे हार्ड कॉपी नव्हती, मी रांगेत उभी होते, त्यावेळी त्यांनी मला विचारले तुमचा बोर्डिंग पास कुठे आहे? मी म्हणाले- मी आणला नाही, विसरले. जेव्हा मी बोर्डिंग पास घेण्यासाठी परत गेले, तेव्हा त्याठिकाणी असणारी व्यक्ती म्हणाली की तुमच्या फोनमधील बोर्डिंग पास दाखवला तरी चालेल. मग मी पुन्हा येऊन रांगेत उभी राहिले. त्यांनी परत माझ्याकडे बोर्डिंग पासची हार्ड कॉपी मागितली. यामुळे मला खूप राग आला, मला ओरडायचे नव्हते, तर ओरडले- म्हणाले की तुम्ही लोकांनी एकमेकांना समजायला हवे.' व्हिडीओच्या शेवटी, नीना असं म्हणाल्या आहेत की, 'माझा अनुभव सांगतो की तुम्ही लोकांनी आतापासून हार्ड कॉपी ठेवावी.'

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

नीना यांच्या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. शिवाय काही कलाकारांनी देखील त्यांच्या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. सोनी रझदान यांनी देखील कमेंट करत म्हटलं आहे की, हे खरं नाही आहे. अनेकदा लोकं डिजिटल कॉपीच वापरतात. आज कदाचित तुम्ही गोंधळलेल्या स्टाफमुळे अनलकी ठरलात.

पॉकेट मनीसाठी केली होती फिल्मजगतात एंट्री, आज आहे आघाडीची अभिनेत्री

यावर नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा हिने मजेशीर कमेंट केली आहे. तिने असं म्हटलं आहे की नीना जेव्हा हा व्हिडीओ बनवत होत्या तेव्हा एका माणसाला बोर्डिंग गेट आणि नीना यांच्या मधून बॅग घेऊन जाताना त्रास झाला. त्यावर नीना यांनी मसाबाला गप्प केले आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News