मौसमी चॅटर्जींची मुलगी पायलचं 45 व्या वर्षी निधन; मुलीची काळजी पती घेत नसल्याचा होता आरोप

मौसमी चॅटर्जींची मुलगी पायलचं 45 व्या वर्षी निधन; मुलीची काळजी पती घेत नसल्याचा होता आरोप

पायल मुखर्जी गेल्या दोन वर्षांपासून कोमात होती.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : हिंदी चित्रपटांतली प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चटर्जी यांची मुलगी पायल मुखर्जीचं मुंबईत दीर्घ आजाराने निधन झालं. पायल 45 वर्षांच्या होत्या आणि गेले दोन वर्षं कोमात होत्या. त्यांच्या मृत्यूच्या बातमीला कुटुंबाने दुजोरा दिला आहे.

पायल मुखर्जीला गंभीर स्वरूपाचा मधुमेह होता. त्यामुळे त्या दोन वर्षांपासून कोमात होत्या. गुरुवारी पायलने अखेरचा श्वास घेतला.

2010 मध्ये मौसमी चटर्जी आणि जयंता मुखर्जींची मुलगी पायलचा विवाह डिक्की सिन्हा नावाच्या एका व्यावसायिकाबरोबर झाला होता. त्याही वेळीही पायल मधुमेहग्रस्त होती. डायबेटिस गंभीर स्वरूपाचा होता. 2017 मध्ये पायल या आजारामुळेच कोमात गेली.

2018 मध्ये पायलच्या आजाराबद्दल माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या. त्या वेळी आई मौसमी आणि वडील मुखर्जींनी जावई डिक्कीविरोधात कोर्टात धाव घेतली होती. आपल्या मुलीची व्यवस्थित काळजी घेत नसल्याचे आरोप आई-वडिलांनी केले होते.

एवढंच नाही तर कोर्टात याचिका दाखल करून मुलीचा पती तिची काळजी घेत नसल्यामुळे तिची देखभाल करण्याचे हक्क आम्हाला द्यावेत, अशी मागणी केली होती.

हिंदुजा रुग्णालयात गुरुवारी पायलने अखेरचा श्वास घेतला.

-------------------------------------------

अन्य बातम्या

OMG! पाकिस्तानमध्ये वर्षभरात सर्वाधिक सर्च झाली बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री

PM मोदींवरील सिनेमानंतर भन्साळी करणार बालाकोट एअर स्ट्राइकवर सिनेमाची निर्मिती

रानू मंडलचं ‘तेरी मेरी...’ नाही तर ‘हे’ आहे Google वर सर्वाधिक सर्च केलेलं गाणं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 06:50 PM IST

ताज्या बातम्या